उरणमध्ये पर्यावरणप्रेमींना ठार मारण्याची धमकी

उरणमध्ये पर्यावरणप्रेमींना ठार मारण्याची धमकी

Published on
उरणमध्ये पर्यावरणप्रेमींना ठार मारण्याची धमकी अज्ञांतावर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. २५ : उरण तालुक्यातील पाणजे पाणथळ जागेवर पक्षी आणि पाणथळ निरीक्षणासाठी आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना अज्ञातांकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न काही लोकांच्या वाईट मनसुब्यांच्या आड येत असल्याने गुंड करून धमक्यावले जात असल्याचे नेटकनेक्ट फाऊंडेशनने सांगितले. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाईची मागणी पर्यावरणवादी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ देबी गोयंका दोन महसूल अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी पाणथळ क्षेत्राला भेट देण्यासाठी गेले होते. या क्षेत्रात स्थलांतरित पक्ष्यांना हुसकावण्याकरिता फटाके फोडण्याचे प्रसंग घडत असून त्यासंबंधी अधिक माहिती घेण्याकरिता गोयंका आले होते. भरतीच्या पाण्याला घातलेल्या बांधावर त्यांना लाकडी ठोकळा निदर्शनास आला. सर्कल निरीक्षक गणेश गोरेगांवकर यांनी हा ठोकळा हटवला. पाण्याच्या बुजवलेल्या प्रवाहाला वाट करून देण्यात आल्याने दोन स्थानिक गावकरी घटनास्थळी आले. त्यांनी वाद घालण्यास सुरुवात करून गोयंका यांना वाईट शब्द वापरले. घटनास्थळी गोयंका व इतरांची भेट प्रसिद्ध पक्षी निरीक्षक पराग घरत यांच्याशी झाली. यावेळी या दोन गावकऱ्यांनी पराग घरत यांना जीवे मारून, गाडून टाकण्याची धमकी दिली. पक्ष्यांची छायाचित्रे इतरांना न पाठवण्याची धमकीही या व्यक्तींनी पराग यांना दिल्याचे गोयंका यांनी सांगितले. या भेटीदरम्यान गोयंका यांच्यासोबत त्यांची सहकारी डॉ. श्वेता भट्ट, दोन वनरक्षक, कांदळवन कक्षाचे आशा वाडे आणि संतोष इंगोले देखील उपस्थित होते. या प्रसंगाने एका युवा वन्यजीवप्रेमीच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पर्यावरणाला धोक्यात टाकण्यात आल्याची माहिती नेटकनेक्ट फाऊंडेशन आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. -कोट-------- उरण भागातील जैवविविधतेभोवती सुरू असलेल्या कारस्थानाबद्दल आम्ही मूग गिळून गप्प बसू शकत नाही. पाणजे पाणथळ आणि जैवसमृद्धतेभोवती कारस्थानाचे अनेक प्रसंग घडले असून जीवे मारण्याची धमकी ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा सगळा प्रकार सरकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष घडल्याने आता आपल्याकडे भक्कम पुरावा आहे. पोलिस स्वत:हून ‘सुओ मोटो’ कारवाई करून गुन्हेगारांना शिक्षा करू शकतील. - बी. एन. कुमार, नेटकनेक्ट संचालक पाणथळ क्षेत्राच्या संरक्षणार्थ प्रयत्नशील असणाऱ्यांच्या मार्गात कारस्थानाचे अडथळे निर्माण करणाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सरकारने दिले पाहिजे. काही समाज-विघातक घटकांनी पाणजे पाणथळ बुजविण्याचा चंगच बांधला असून कॉन्क्रिटचे जंगल उभारण्याचा त्याचा डाव आहे. - नंदकुमार पवार, श्री एकविरा आई प्रतिष्ठान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com