Mon, August 15, 2022

१७०० डॉक्टरांवर अन्याय
१७०० डॉक्टरांवर अन्याय
Published on : 25 December 2021, 12:29 pm
कोविड सेवा बजावूनही
निवासी डॉक्टरांना पैसे नाहीत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सेवा दिलेल्या १७०० तृतीय वर्षातील डाॅक्टर विद्यार्थ्यांनाही ऋणनिर्देश म्हणून शासनाने जाहीर केलेले प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मिळावेत, अशी मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बाँडेड सीनिअर रेसिडेंट डाॅक्टर संघटनेने केली आहे.
कोविड कर्तव्यावर रुजू असणाऱ्या निवासी डॉक्टरांना प्रत्येकी एक लाख २१ हजार रुपये देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे; मात्र या शासन निर्णयातून २०१८ बॅचच्या तृतीय वर्षाच्या डाॅक्टरांना डावलण्यात आले आहे, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. कोविड काळात डाॅक्टरांची कमतरता असताना तृतीय वर्षातील डाॅक्टर विद्यार्थ्यांनीही जीवाची बाजी लावून काम केले. त्यामुळे ऋणनिर्देश निधी देताना कोरोनामध्ये प्रत्यक्ष सेवा दिलेल्या निवासी २०१८, २०१९, २०२० या बॅचचादेखील स्पष्ट उल्लेख करावा, अशी मागणी संघटनेचे डॉ. दीपक मुंडे यांनी केली आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या निवासी डॉक्टरांची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे त्यांच्या बंधपत्रित सेवा रखडल्या आहेत. त्यामुळे कोरोना काळातील सेवाही बंधपत्रित सेवाकाळ म्हणून गणण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही पत्र लिहून हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..