मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्यातील आणखी एक साक्षीदार फितूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्यातील आणखी एक साक्षीदार फितूर
मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्यातील आणखी एक साक्षीदार फितूर

मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्यातील आणखी एक साक्षीदार फितूर

sakal_logo
By
मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्यातील आणखी एक साक्षीदार फितूर सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २५ : २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाॅम्बस्फोटाच्या खटल्यात आणखी एक साक्षीदार फितूर झाला आहे. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाला दिलेल्या जबानीशी संबंधित साक्षीदाराने फारकत घेतली आहे. दरम्यान, या खटल्यात आतापर्यंत तेरा जणांनी साक्ष फिरवली आहे. मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्यात भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा प्रमुख आरोपी म्हणून एनआयएने उल्लेख केला आहे. सध्या विशेष न्यायालयात यावर खटला सुरू आहे. याप्रकरणी एका साक्षीदाराचा २००९ मध्ये जबाब नोंदविण्यात आला होता. त्यानुसार साक्षीदार हा स्वामी शंकराचार्य (आरोपी सुधाकर द्विवेदी) यांना नाशिकमध्ये भेटण्यासाठी गेला होता. तिथे बैठकीत पुरोहित यांनी हिंदुत्वावर व्याख्यान दिले होते, असे त्याने जबाबात म्हटले होते. बुधवारी खटल्यादरम्यान यावर साक्षीदाराने असहमती दर्शविली आणि नाशिकमध्ये गेलोच नाही, असे सांगितले. त्यामुळे एनआयएने त्याला फितूर घोषित केले. तसेच, या बैठकीत स्फोटासंबंधित चर्चा झाली आणि हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाबाबत सांगण्यात आले होते आणि एक सीडीही दाखविण्यात आली होती, असा दावा एटीएसने केला होता. या खटल्यात आतापर्यंत २१८ पैकी १३ साक्षीदार फितूर झाले आहेत. एनआयएने एटीएसची मदत घ्यावी! मालेगावमध्ये २००८ मध्ये बाॅम्बस्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. साक्षीदार फितूर होत असल्यामुळे एनआयएने एटीएसची मदत घ्यावी, असे सुचवणारी याचिकाही न्यायालयात करण्यात आली आहे. सुरुवातीला एटीएस या प्रकरणाचा तपास करत होती; मात्र आता हा तपास एनआयए करत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..