‘गुलजार’ चित्रांचे ‘सिमरोझा’त प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गुलजार’ चित्रांचे ‘सिमरोझा’त प्रदर्शन
‘गुलजार’ चित्रांचे ‘सिमरोझा’त प्रदर्शन

‘गुलजार’ चित्रांचे ‘सिमरोझा’त प्रदर्शन

sakal_logo
By
‘गुलजार’ चित्रांचे ‘सिमरोझा’त प्रदर्शन सकाळ न्यूज नेटवर्क मुंबई, ता. १ : गुलजार यांच्या कवितेच्या निस्सीम चाहत्या असलेल्या बंगळूरुस्थित कलाकार मिन्जल मुखिजा यांनी त्यांच्या चित्रांमध्ये कवितेच्या विविध छटा चितारण्याचा प्रयत्न केला आहे. या महान कवीच्या कवितांमधील शब्दांना चित्राकार देण्याचा प्रयत्न मुखिजा यांनी केला आहे. चित्रांचे हे प्रदर्शन ३ ते १० जानेवारीदरम्यान (रविवारव्यतिरिक्त) सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत कलारसिकांना मुंबईतील सिमरोझा आर्ट गॅलरीत पाहता येईल. २०१५ मध्ये मिन्जलने गुलजार यांची भेट घेतली आणि या महान कवीच्या कवितांवर आधारित त्यांनी काढलेल्या चित्रांना परवानगी मागितली. मुखिजा म्हणाल्या की, गुलजार यांनी आणखी एक वर्ष पेंटिंगवर काम करण्यास सुचवले. गुलजार यांच्या अपेक्षांनुसार स्वत:ला विकसित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले; पण एक दिवस असा आला की गुलजार यांनी त्यांच्या कवितांवर काम करण्याची परवानगी दिली. तो आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण होता. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top