आयकरच्या पुर्नमूल्यांकनाला याचिकेद्वारे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयकरच्या पुर्नमूल्यांकनाला याचिकेद्वारे आव्हान
आयकरच्या पुर्नमूल्यांकनाला याचिकेद्वारे आव्हान

आयकरच्या पुर्नमूल्यांकनाला याचिकेद्वारे आव्हान

sakal_logo
By
आयकरच्या पुनर्मूल्यांकनाला याचिकेद्वारे आव्हान सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १ : आयकर विभागाने २०१३-१४ मधील आयकर परताव्याचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी करदात्याला बजावलेल्या नोटीसबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच, या नोटिशीवर तूर्तास कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकादार ब्रिज मोहन जिंदाल यांनी उच्च न्यायालयात या नोटीसला याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. आयकर विभागाने चालू वर्षी आयकर कायद्यात सुधारणा करून विशिष्ट कालावधीत केलेल्या परताव्यांच्या पुनर्मूल्यांकन करण्याची तरतूद केली आहे. यानुसार मूल्यांकन अधिकाऱ्यांनी जिंदाल यांच्या २०१३ -१४ मधील आयकर परताव्याचा फेर आढावा घेण्यासाठी नोटीस बजावली आहे. विभाग अशाप्रकारे सरसकट सुधारणा करून आयकर परताव्यांचे पुनर्मूल्यांकन करू शकत नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. न्या. शाहरूख काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने याचिका सुनावणीसाठी मंजूर केली आहे. या मुद्यावर अन्य काही याचिका दाखल झाल्या आहेत आणि ॲटर्नी जनरल यांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top