समाजसेवी स्वयंप्रेरणा

समाजसेवी स्वयंप्रेरणा

समाजसेवी स्वयंप्रेरणा ----------- एन्ट्रो कोरोना काळात अनेकांना वेगवेगळ्या संकटांतून सामोरे जावे लागले. काहींना रोजची चूल पेटवणेही कठीण झाले. त्यांना मदत करण्यासाठी राजकीय कार्यकर्ते, सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था अहोरात्र झटत होत्या. याच काळात समाजकार्याची आवड असणारे सामान्य नागरिकही स्वयंप्रेरणेने मदतीसाठी धावले. अशा असंख्य ज्ञात-अज्ञात सेवाव्रतींचा कोरोनाच्या कठीण काळात गोरगरिबांना आधार मिळाला. यात स्वयंस्फूर्तीने मदत करण्यात सर्वसामान्य महिलाही मागे नव्हत्या. कोरोना महामारीत आणि कोरोनोत्तर काळातही अशाच गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या इशा बर्थवाल, प्रिया शर्मा आणि चैत्रा यादवर या तिघी. त्यांची गोष्ट स्वयंसेवी समाजमनाला नवी ऊर्जा देईल. ---- इशाने उभारली मदतनिधीची चळवळ इशा बर्थवाल बेलापूरमध्ये राहणारी २८ वर्षांची तरुणी. सीए आहे. कार्यालयीन काम पूर्ण केल्यानंतर जास्तीत जास्त वेळ ती गरीब मुलांसाठी देते. त्यांना शिकायला लागणारे साहित्य देऊन, वेगवेगळ्या कारणांनी मुलांच्या मनावर झालेल्या आघातातून सावरण्यासाठी समुपदेशन करते. त्यांचे जगणे सुकर होण्यासाठी ती धडपडते आहे. त्यासाठी मे २०२१ मध्ये इशाने जनरेशन एसकेपी फाऊंडेशन सुरू केले आहे. कोविडपूर्व काळात एका घटनेने तिला समाजकार्याची ओढ लावली. आठ वर्षांआधी फुटपाथवर राहणाऱ्या तीन लहान मुली आणि एक मुलगा, असे चार भाऊबहिणी अचानक अनाथ झाले. संवेदनशील असणाऱ्या इशाला त्यांच्यासाठी काही तरी करावेसे वाटले. काय करता येईल, याचा अभ्यास करून या चारही अनाथांना एका आश्रमामध्ये नेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यापर्यंत इशाने मदत केली. आज त्या मुली आणि त्यांचा भाऊही अभ्यासामध्ये पुढे जात आहेत. त्यांच्याच नावांची अद्याक्षरांवर ‘जनरेशन एसकेपी’ ही संस्था तिने सुरू केली आहे. आपल्या पुढाकाराने कुणाचे तरी आयुष्य आनंददायी होऊ शकते, कुणाला तरी जगण्याची प्रेरणा मिळते, याचे आठ वर्षांपूर्वी आत्मिक समाधान कमावलेल्या इशाला कोरोना महामारीत गरजूंना मदत केली पाहिजे याची जाणीव झाली. इशा एका संस्थेसोबत ४२ दिवस स्वयंसेवक म्हणून राबली. लॉकडाऊनच्या काळात मदतीची गरज असणारे असंख्य होते. इशा ज्या संस्थेसोबत काम करत होती, त्या संस्थेचा मदतनिधी कमी पडत होता. ही अडचण ओळखून इशाने या कार्यासाठी थोडे थोडे पैसे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींकडून जमा करण्याची जनचळवळच सुरू केली. त्यातून मोठा मदत निधी गरजूंपर्यंत पोहचवला. काही दिवसांनी तिने राशनवाटप सुरू करून सुमारे दीडशे कुटुंबांना धान्य पुरवठा केला. त्यासाठी पूर्ण पैसे तिच्या ओळखीच्या लोकांनी दिले. कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतरही अनेकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे. काही पालकांना त्यांच्या मुलांची शाळेची फी भरणेही कठीण जात आहे. रोजगार बुडाल्याने अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अशा असंख्य कुटुंबांसाठी इशा मदत निधी गोळा करून त्यांना जीईएन एसकेपी फाऊंडेशनच्या वतीने मोलाचा आधार देत आहे. छायाचित्र : ०८८ --- प्रिया शर्माची ‘आहन वाहन’ मोहीम प्रिया शर्मा ही आयआयटी बॉम्बेची पीएच.डी.ची विद्यार्थिनी आहे. तिने लॉकडऊनमध्ये अडकलेल्या चार हजार ६०० परप्रांतीय कामगारांना घरी परत जाण्यासाठी मदत केली व त्यांचे पुनर्वसन कारण्यासाठी काम केले आहे. हे काम तिने काही संस्थांबरोबर ‘आहन वाहन’ या मोहिमेतून केले. २०२० मध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर प्रियाला परिसरात अडकलेले असंख्य मजूर दिसले. त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांचा रोजच्या जगण्यासाठीही संघर्ष सुरू होता. त्यामुळे त्यांना अन्नधान्याची मदत करण्यासाठी आयआयटीतील विद्यार्थ्यांसोबत प्रिया धावली. सर्वत्र भीतीचे वातावरण असल्याने मजुरांना गावी जायचे होते. त्यांना पाठवायचे कसे, त्यासाठी प्रियाची धडपड सुरू झाली. रेल्वे बंद होती. त्यामुळे खासगी बस बुक करून मजुरांना पाठवण्यासाठी शोधाशोध केली. खासगी बसचे भाडे विमान तिकिटापेक्षाही जास्त होते. त्यामुळे प्रियाने मजुरांना विमानानेच पाठवले. दरम्यान, मजुरांना परत जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या. त्यासाठी गोरगरिबांना मदत करणारी यंत्रणा उभारली. गरजवंत आणि मदतगार यांच्यातील दुवा होऊन प्रियाने आपत्कालीन हेल्पलाईन बनवली. त्याद्वारे सरकारपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत आणि स्वयंसेवकांपासून ते गरजू लोकांपर्यंत सर्वांना जोडले. या माध्यमातून प्रियाने लोकांना अन्न, औषधे, घराचे भाडे, शिक्षणाचा खर्च यासाठीही कोरोना महामारीत सतत मदत केली. मदतीसाठी प्रिया अनेक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी झाली. वकील, नाट्यकलावंत, प्रशासकीय अधिकारी, उद्योजकांपासून सर्वसामान्यांपर्यंत ज्यांना आर्थिक मदत करायची आहे, पण ती गरजवंतांपर्यंत पोहचली पाहिजे, अशांचा विश्वास प्रियाने जिंकला. त्यामुळे मदतीचा ओघ वाढला. काही माजी विद्यार्थ्यांचे ग्रुप, काही संघटना या कामासाठी धावून आल्या. लॉकडाऊनच्या काळात प्रियाने वेगवेगळ्या राज्यांच्या सरकारी यंत्रणांशीही समन्वय केला. मुंबईतून गेलेल्या नागरिकांचे तेथील स्थानिक यंत्रणेने विलगीकरण करणे गरजेचे होते. यासाठी समन्वय करताना सरकारी यंत्रणेने केलेल्या मदतीबद्दलही प्रिया कृतज्ञता व्यक्त करते. प्रिया म्हणते, की मी माझ्या परीने छोटेसे प्रयत्न केले, पण कठीण काळात खूप लोक खऱ्या अर्थाने माणुसकीने जगले आहेत. प्रत्येकाने एकमेकांना सांभाळून घेतले. अनेकांनी या काळात खूप मोलाचे काम केले; पण ते प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले. त्या सर्वांप्रती आपण साऱ्यांनीच कृतज्ञ असायला हवे. छायाचित्र : प्रिया शर्मा MUM२१D७४०८७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com