अंधेरीत निर्बंध मोडत मालवणी जत्रोत्सव

अंधेरीत निर्बंध मोडत मालवणी जत्रोत्सव

अंधेरीत निर्बंध मोडत मालवणी जत्रोत्सव व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १ : कोविडच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे अधिवेशन अवघ्या पाच दिवसात आटोपण्यात आले. रुग्ण वाढू लागल्यावर राज्यभरात निर्बंध लागू करण्यात आले. मुंबईतील नियम तयार करण्याची जबाबदारी महानगर पालिकेवर आहे. मात्र, मुंबई महानगर पालिकेच्या मैदानावरच मालवणी जत्रोत्सव सुरू असल्याचा खबळजनक प्रकार उघड झाला. त्याहून धक्कादायक म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच हा मेळावा भरवला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात अवघ्या पाच दिवसात विधीमंडळाचे अधिवेशन आटोपण्यात आले. त्या काळातही अनेक आमदार, मंत्र्यांना कोविडची बाधा झाली. अशातच डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोविडचे रुग्ण आढळू लागल्या पासून रात्रीची संचारबंदी लागू लागली. लग्नसोहळ्यांवर उपस्थितीचे निर्बंध आणण्यात आले. असे असतानाही अंधेरीतील डी. एन. नगर परिसरातील पालिकेच्या मैदानावर गेल्या काही दिवसांपासून जत्रोत्सव सुरू होता. शनिवारी या जत्रोत्सवाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत हा जत्रोत्सव भरण्यात आल्याचे समजते. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. शनिवारीही येथे तुडूंब गर्दी होती. मात्र,व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी कारवाई सुरू केली.मात्र, नियम बनविणाऱ्या पालिकेच्या मैदानावरच हा जत्रोत्सव सुरू असल्याने आता काय कारवाई करणार असा प्रश्‍न विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com