कामा रुग्णालयात ३३८ कोरोनाबाधित महिलांच्या प्रसूती

कामा रुग्णालयात ३३८ कोरोनाबाधित महिलांच्या प्रसूती

कामा रुग्णालयात ३३८ कोरोनाबाधित महिलांची प्रसूती ४३ कोविड संसर्गित बालकांचा जन्म भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २ : पालिकेच्या नायर रुग्णालयानंतर राज्य सरकारच्या कामा रुग्णालयात गर्भवती स्त्रियांसह विविध आजारांनी ग्रस्त महिलांवर उपचार केले गेले. कामा रुग्णालयात कोरोना आणि कोरोना नसलेल्या महिलांना उपचार दिले गेले. प्रसूती किंवा महिलांशी निगडित विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी राज्यभरातून महिला मुंबईच्या कामा रुग्णालयामध्ये येतात. कोविड काळातही महिलांची गर्दी ओसरली नाही. गेली पावणे दोन वर्षे कोविडचा सामना करत ३३८  कोविड बाधित महिलांच्या यशस्वीपणे प्रसूती करण्यात आल्या. रुग्णालय  प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोविड महामारीदरम्यान कामा रुग्णालयात १ मार्च २०२० ते ३० डिसेंबर २०२१ या पावणे दोन वर्षांच्या कालावधीत ३३८  कोविड पॉझिटिव्ह महिलांची सुखरूप प्रसूती करून डॉक्टरांनी आई आणि बाळाचे प्राण वाचवले आहेत. याच कालावधीत एकूण ४३ कोविड पॉझिटिव्ह नवजात बालकांचा जन्म झाला आहे. रुग्णालयातील एकूण ५,०५१ प्रसूती झाल्या. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला.   पालिकेचे नायर हे कोरोनाबाधित महिलांची प्रसूती करणारे एकमेव रुग्णालय होते; तर राज्य सरकारच्या कामा रुग्णालयातही कोविडबाधित महिलांची प्रसूती केल्या. गर्भवती महिला या जोखमीच्या गटातील आहेत. काही वेळेस लक्षणे असूनही या महिला रुग्णालयात उशिरा दाखल होत आहेत. परिणामी उपचार उशिरा सुरू होऊन काही महिलांची प्रकृतीही अधिक खालावते. तेव्हा महिलांना कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवल्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी आवर्जून नमूद केले आहे. कामा रुग्णालयात एकूण ओपीडीत ७३, ५२१ महिला रुग्ण दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १८, २९१ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. यासह १,१४२ कोविड महिलांना दाखल करून उपचार केले गेले. त्यातील ३३८ महिलांच्या प्रसूती करण्यात आल्या. ... लसीकरणातही अव्वल कामा रुग्णालयाने कोविड विरोधातील लसीकरणातही पुढाकार घेत १,१४,३३९ नागरिकांना लसीकरण केले आहे. एकूण ४८ लसीकरण शिबिरे घेत हे लसीकरण केले गेले आहे. ... रुग्णालयात स्त्रियांसाठी प्रथमच एचडीयू सीएसटीजवळील कामा व आल्ब्लेस या १३५ वर्षे जुन्या रुग्णालयात प्रथमच स्त्रियांसाठी एचडीयू (हाय डिपेंडंसी युनिट) आणि अतिदक्षता विभाग सुरू केला गेला आहे. एचडीयू हा आयसीयूचाच एक प्रकार आहे. एचडीयू हे रुग्णालयातील विशेष कर्मचाऱ्यांसह आणि सुसज्ज क्षेत्र आहे, जिथे सर्वाधिक काळजी  घेतली जाते. आतापर्यंत ९० रुग्णांना एचडीयूचा फायदा झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.  या सह रुग्णालयात १८ खाटांचा अतिदक्षता विभाग तयार केला आहे.  अनेकदा आयसीयू बेड उपलब्ध होत नाही अशा वेळेस रुग्णांना एचडीयूमध्ये ठेवले जाऊ शकते, असेही डॉ. पालवे यांनी सांगितले. ... प्राणवायूसाठी दोन प्रकल्प कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्राणवायूची कमतरता भासू नये म्हणून दोन प्रकल्पांची उभारणी रुग्णालयात करण्यात आली आहे. १३ किलो लिटरचे दोन मोठे सिलिंडरही रुग्णालयात उपलब्ध आहेत. यातून १३ लाख लिटर ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो. जम्बो केंद्रात ७ ते ८ किलो लिटरचा सिलिंडर असतो. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com