जिओ व एअरटेलकडून ओटीटी सबस्क्रिप्शनचा प्लॅन
नवी दिल्ली, ता. २ ः देशात ओटीटी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, डिस्ने प्लस हॉटस्टार, झी ५, सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म्सला जास्त ग्राहक आहेत. या सर्व ओटीटींचे सबस्क्रिप्शन घेतले तर महिन्याला एक हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो, पण आता जिओ आणि एअरटेल या दोन दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या पोस्टपेड प्लॅनममध्ये या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन स्वस्तात उपलब्ध करून दिले आहे.
रिलायन्स जिओकडून सहा पोस्टपेड प्लॅन जारी करण्यात आले आहेत. त्यात पाच पोस्टपेड प्लस प्लॅन, तर एक रेग्युलर प्लॅन आहे. १९९, ३९९, ५९९, ७९९, ९९९, १४९९ रुपये असे हे प्लॅन आहेत. या सर्व प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, डिस्ने प्लस हॉटस्टार यांचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग, फ्री जिओ प्राईम, रोज १०० एसएमएसचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. या तिन्हीच्या मासिक सबस्क्रिप्शनचा मासिक खर्च ६२७ रुपये आहे.
तर एअरटेलकडे चार पोस्टपेड प्लॅन आहेत. यात ३९९, ४९९, ९९९, १५९९ चे प्लॅन्स आहेत. या प्लॅन्सवर कंपनी अॅमेझॉन प्राईम आणि डिज्ने हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन देत आहे. यासोबतच फ्री एअरटेल एक्स्ट्रीम ॲप, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसचे सबस्क्रिप्शन देत आहे. या प्लॅनचा मासिक सबस्क्रिप्शनचा मासिक खर्च ४७८ रुपये आहे.