सेमीकंडक्टर तुटवड्याचा वाहन उत्पादकावंर परिणाम कायम

सेमीकंडक्टर तुटवड्याचा वाहन उत्पादकावंर परिणाम कायम

वाहन उद्योगाला सेमीकंडक्टरचा शॉक चिपच्या तुटवड्याने डिसेंबरमध्ये मारुती, हुंदाईची कार विक्री घटली सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता.२ : कार उत्पादक कंपन्यांच्या विक्रीवर सेमीकंडक्टर तुटवड्याचा परिणाम सुरूच आहे. मारुती सुझुकी, हुंदाई इंडिया मोटर, महिंद्रा आणि महिंद्रा या देशातील चार आघाडीच्या कंपन्यांनी शनिवारी आपल्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार डिसेंबरमध्ये मारुतीच्या विक्रीत १४ टक्के, तर हुंदाईच्या विक्रीत ३२ टक्के घसरण झाली. मात्र त्याचवेळी टाटा मोटर्स, महिंद्रा या कंपन्यांनी आपल्या वाहन विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली. दुचाकी वाहन आणि ट्रॅक्टर विक्रीचा वेग मंदावला असल्याचे चित्र आहे. मारुती सुझुकीने डिसेंबर महिन्यात एकूण १,२६,०३१ वाहन विक्रीची नोंद केली. गतवर्षी डिसेंबरच्या तुलनेत त्यात १४ टक्के घसरण आहे. महिन्याकाठी दीड लाख कार विक्रीचे लक्ष्यही कंपनी यावेळी गाठू शकलेली नाही. मात्र, नोव्हेंबरच्या तुलनेत वाहन विक्रीचे प्रमाण ११.५ टक्क्याने वाढले होते. ग्राहकांकडून मागणी असूनही सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे आम्ही डिलीव्हरी देऊ शकत नाही. येत्या काळात हा प्रभाव कमी करण्याचे कंपनीचे लक्ष्य असल्याचे सुझुकीच्या वतीने सांगण्यात आले. हुंदाई इंडिया मोटरने डिसेंबरमध्ये एकूण ३२, ३१२ वाहने विकली. गेल्या डिसेंबरच्या तुलनेत त्यात ३२ टक्क्याने घट झाली. नोव्हेंबरमध्येही हुंदाईचे सेल्स टार्गेट २४ टक्क्याने घसरले होते. सेमीकंडक्टरचा तुटवडा हे या मागचे प्रमुख कारण असल्याचे कंपनीने सांगितले. दुसरीकडे टाटा मोटर्स आणि महिंद्रा या कंपन्यांची वाहन विक्री वाढली असल्याचे चित्र आहे. डिसेंबरमध्ये टाटाची देशाअंतर्गत वाहन विक्री २४ टक्क्याने वाढली. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी कार विक्री दुप्पट झाली. तर व्यावसायिक वाहन विक्री ४ टक्के वाढली. वर्षभरात कंपनीने ३ लाख ३१ हजार १७८ वाहन विक्रीचे लक्ष्यही गाठले. महिंद्रानेही डिसेंबरमध्ये विविध श्रेणीतील ३६,१४० वाहने विकली. गेल्या वर्षी डिसेंबरच्या तुलनेत यावेळी प्रवासी वाहन विक्रीत १० टक्के वाढ कंपनीने नोंदवली. कंपनीने व्यावसायिक, प्रवासी आणि आंतराष्ट्रीय विक्रीत वाढ झाली आहे. मात्र ट्रॅक्टर विक्री २१ टक्क्याने मंदावली. ...... दुचाकी वाहन विक्रीत घट हिरो कॉर्पच्या विक्रीला डिसेंबरमध्ये मोठा ब्रेक लागला. कंपनी या महिन्यात ३,७४,४८५ दुचाकी वाहन विकू शकली आहे. गत डिसेंबरच्या तुलनेत विक्रीत १२ टक्के घसरण झाली. वार्षिक वाहन विक्रीही १४ टक्क्याने घसरली आहे. देशात पुन्हा तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने येत्या महिन्यात दुचाकी वाहन विक्रीवर नकारात्मक परिणाम होणार असल्याचा कंपनीचा अंदाज आहे. .... इलेक्ट्रीक वाहनांत टाटाची झेप टाटा मोटर्सने इलेक्ट्रीक वाहन विक्रीत वेग पकडला आहे. कंपनीने पहिल्यांदा एका महिन्यात २ हजार इलेक्ट्रीक वाहन विकण्याचा टप्पा गाठला. डिसेंबरमध्ये कंपनीने २ हजार २२५ इलेक्ट्रीक वाहने विकली. पहिल्या ९ महिन्यांत कंपनीची इलेक्ट्रीक वाहन विक्री १० हजारांवर पोहोचली. ..... कोट गेल्या वर्षी ट्रॅक्टरची तडाखेबंद विक्री झाली. मात्र यंदा मात्र अवकाळीमुळे ट्रॅक्टरच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. खरीप हंगामातील उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसै पडल्यावर ट्रॅक्टर खरेदी स्थिर येईल. - हेमंत सिक्का, संचालक (महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, कृषी वाहन) ... ग्राफीक्ससाठी कंपनी आणि वाहन विक्री मारुती सुझुकी डिसेंबर २०२० एकूण वाहन विक्री-१,४६,४८० डिसेंबर २०२१ एकूण वाहन विक्री- १,२६,०३१ परिणाम - १४ टक्के (कमी) ..... हुंदाई मोटर इंडिया डिसेंबर २०२० एकूण वाहन विक्री-४७,४०० डिसेंबर २०२१ एकूण वाहन विक्री- ३२,३१२ परिणाम- ३२ टक्के (कमी) ... हिरो मोटरकॉर्प डिसेंबर २०२० एकूण वाहन विक्री-४,२५,०३३ डिसेंबर २०२१ एकूण वाहन विक्री-३,७४,४८५ परिणाम- १२ टक्के (कमी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com