मुंबईत लाखांपेक्षा जास्त घरविक्रीचे रजिस्ट्रेशन

मुंबईत लाखांपेक्षा जास्त घरविक्रीचे रजिस्ट्रेशन

मुंबईत लाखांपेक्षा जास्त घरविक्रीचे रजिस्ट्रेशन मुंबई, ता. २ ः महामुंबई परिसरात सरत्या वर्षात आतापर्यंतचे विक्रमी म्हणजे एक लाख ११ हजार ५५२ घरांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. ही संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ७० टक्के जास्त आहे. डिसेंबर महिन्यातच नऊ हजार ३२० घरांचे रजिस्ट्रेशन झाले. मालमत्ताविषयक एका सल्लागार संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. २०२० या वर्षापेक्षा २०२१ या वर्षाच्या रजिस्ट्रेशनच्या संख्येत ७० टक्के वाढ झाली आहे; तर नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये २३ टक्के वाढ झाली, पण डिसेंबर २०२० च्या तुलनेत डिसेंबर २०२१ चे रजिस्ट्रेशन ५२ टक्के घटले आहे. डिसेंबर २०२० मध्ये मुद्रांक शुल्काचे दर शून्य टक्के असल्याने त्या महिन्यात घरांचे रजिस्ट्रेशनही वाढले होते. आता ती सवलत काढून घेतल्याने रजिस्ट्रेशन घटले; तर कोविडपूर्व काळाच्या म्हणजे डिसेंबर २०१९ च्या तुलनेत रजिस्ट्रेशनची संख्या ४५ टक्के वाढली आहे. सरत्या वर्षातील डिसेंबरमध्ये रोज सरासरी ३०१ रजिस्ट्रेशन झाले. गेल्या पाच महिन्यांमधील हा सर्वांत वेगवान दर आहे. डिसेंबरच्या पहिल्या २० दिवसांत रोज २९३ घरांचे रजिस्ट्रेशन झाले; तर नंतरच्या ११ दिवसांत ही संख्या रोज ३१४ पर्यंत गेली. या वर्षीची १,११,५५२ ही संख्या आतापर्यंतची सर्वोच्च असून, यापूर्वी सन २०१८ मध्ये ८०,७४६ घरांचे रजिस्ट्रेशन झाले होते. मागील वर्षीच्या कोरोना काळात सरकारने पाचपैकी तीन टक्के मुद्रांकशुल्क माफ केले होते; तर बहुसंख्य बिल्डर संघटनांनी उरलेले मुद्रांक शुल्क स्वतः भरले. त्यामुळे ग्राहकांना शून्य टक्के मुद्रांक शुल्काचा लाभ मिळाला. आता अशी कोणतीही सवलत नसली, तरी अजूनही गृहकर्जाचे व्याजदर कमी असून अर्थव्यवस्था पूर्ववत होत असल्याने डिसेंबरमध्ये सर्वांत जास्त रजिस्ट्रेशन झाले, असेही सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com