धारावीत विळखा घट्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीत विळखा घट्ट
धारावीत विळखा घट्ट

धारावीत विळखा घट्ट

sakal_logo
By
धारावीत विळखा घट्ट दुपटीने रुग्णवाढ मुंबई, ता. २ : धारावी, दादर आणि माहीम हे परिसर पुन्हा कोरोनासाठीचे अतिसंक्रमित परिसर ठरले आहेत. या तिन्ही ठिकाणी रविवारी २७४ नव्या रुग्णांची नोंद झाली. ‘जी’ उत्तर विभागातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. धारावीत गेल्या २४ तासांत ६० नवे रुग्ण नोंदवले गेले. या परिसरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या १७९ वर पोहोचल्याची माहिती बृहन्मुंबई पालिकेने दिली. यापाठोपाठ दादरमध्ये १०२, तर माहीममध्ये ११२ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. यानुसार धारावीत आजवर ७,३५७ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, दादरमध्ये १०,९४५, तर माहीममध्ये ११,२४२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.  धारावीत शनिवारी २४ रुग्ण सापडले. ही संख्या दुप्पट होऊन ६० वर पोहोचली आहे. २९ डिसेंबरपासून धारावीत रुग्णवाढ सुरू झाली आहे.  त्याआधी २ ते ३ असे रुग्ण रोज सापडत होते. ... आलेख चढणीला २९ डिसेंबर १७ ३० डिसेंबर  २० ३१ डिसेंबर  ३४ १ जानेवारी  २४ २ जानेवारी  ६० ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top