लसीकरणाला किशोरवयीन मुला मुलींचा  उत्स्फूर्त प्रतिसाद

लसीकरणाला किशोरवयीन मुला मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वाड्यात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद वाडा, ता. ३ (बातमीदार) ः राज्य सरकारने आजपासून १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींच्या लसीकरणाला सुरुवात केली. चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात विशेष कार्यक्रमाने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान पगारे यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व सांगून अफवांवर विश्वास न ठेवता १५ ते १८ वयोगटातील सर्वांनी कोविड लस घेण्याचे आवाहन केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, पंचायत समिती सदस्य राजेश सातवी, कुडूस विभाग शिक्षण सेवा संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील, डॉ. निकिता पाटील आदी उपस्थित होते. चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात ३००, वाडा शहरातील पी. जे. विद्यालयात ३००; तर कंचाड येथील सरस्वती विद्यालयात ३०० मुला-मुलींचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com