आश्रमशाळेतील मुलांना स्वेटरचे वाटप
कासा, ता. ३ (बातमीदार) ः३ डिसेंबर २०२१ पासून डहाणू तालुक्यातील १९ दत्तक घेतलेल्या बहारे, बहारे- सागपाडा, बहारे-डोंगरीपाडा, बहारे- पारसपाडा, वंकास, वंकास- वाघाईपाडा १, वंकास-वाघाईपाडा २, धामणगाव, चिखलीपाडा, सोगावे, सोगावे-पाटीलपाडा, सोगावे-डोंगरीपाडा, सोगावे- धोदडेपाडा, पारसवाडी, पारसपाडा, जामशेत-पाटीलपाडा, जामशेत -मांगत पाडा, जामशेत - डोंगरीपाडा, रानशेत, कोल्हाण, कोसेसरी अशा १९ जिल्हा परिषद शाळांसाठी लुधियानामध्ये खास तयार केलेल्या ३००० नवीन स्वेटर्सचे रोशनी फाऊंडेशन आणि चॕरिटेबल ट्रस्ट मुंबईने मोफत वाटप केले. यामुळे हिवाळा सुरू झाल्याबरोबर वंचित आदिवासी मुलांना उच्च दर्जाचे स्वेटर मिळाले. तसेच विद्यार्थिनींना नवीन निर्यात दर्जाचे लेगिंगचेही वाटप करण्यात आले.
पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना पाट्या देण्यात आल्या. या वेळी विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून केळी देण्यात आली.
ट्रस्ट दत्तक घेतलेल्या शाळेतील मुलांना दर दोन वर्षाने एकदा नवीन स्वेटर्सचे वाटप कले जाते. गावकऱ्यांना हिवाळ्यातील थंडीपासून बचाव करणाऱ्या वस्तूंचेही या वेळी वितरण करते.
वाटपासाठी रोशनी फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त गीता मुछाला व अध्यक्ष संजीव मुछाला, ट्रस्टचे सदस्य दिलीप कवैया, योगिनी त्रिवेदी, कर्मचारी राजू वावरे, जयसिंग वावरे हे शाळांना भेटी देऊन एक वाटपाचे नियोजन करून एक सामाजिक सेवाच करत आहेत.
स्वेटर, लेगिंग व पाटी मिळाल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक व पालक समाधान व्यक्त करून ट्रस्टला धन्यवाद देत आहेत.