जिल्हा परिषद सदस्या मिताली बागुल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद सदस्या मिताली बागुल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जिल्हा परिषद सदस्या मिताली बागुल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जिल्हा परिषद सदस्या मिताली बागुल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

sakal_logo
By
आरोग्य शिबिराला प्रतिसाद वाडा, ता. ३ (बातमीदार) ः पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या मिताली बागुल यांचा वाढदिवस शनिवारी (ता. १) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मानव सेवा संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांना चॉकलेट, बिस्कीट, केक यांचे वाटप करण्यात आले. तसेच ५०० महिलांसाठी साड्या, पुरुषांसाठी टी-शर्ट व तांदूळ तसेच ब्लॅंकेटचे वाटप केले. या कार्यक्रमासाठी मानव सेवा संस्थेचे नीलेश शाह, विपुल मोदी, हर्षद शाह, दिव्याबेन शाह तसेच माजी महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, पंचायत समितीचे वाडाचे उपसभापती अमोल पाटील, उपजिल्हा समन्वयक गोविंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण ठाकरे, राजेश मुकणे, भक्ती वलटे आदी मान्यवर उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top