बाधित वाढले तरी रुग्णालयांत शुकशुकाट

बाधित वाढले तरी रुग्णालयांत शुकशुकाट

बाधित वाढले तरी रुग्णालयांत शुकशुकाट अत्यवस्थ रुग्णांची संख्या कमी सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ३ ः आठवड्याभरापासून ठाणे पालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत पाच पटीने वाढ झाली असली, तरी हा धोका सध्या तरी सौम्य स्वरूपाचा असल्याचे समोर आले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सध्या बाधित आढणारे रुग्ण लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. परिणामी मागील दोन दिवसांपासून हजारापेक्षा जास्त नवीन बाधितांची नोंद होऊनही त्यामध्ये अत्यवस्थ रुग्ण कमी असल्याने रुग्णालयांमध्ये शुकशुकाट आहे. कोरोना संक्रमणाचे थैमान गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. नववर्षातही हे संकट कायम असून जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सापडत आहेत; पण असे असले तरी अत्यवस्थ रुग्णांची संख्या कमी असून मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे दिसून आले आहे. २०२० साली एप्रिल, मे आणि जून महिन्यांत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण साडेपाच ते सहा टक्क्यांपर्यंत होते. जून, २०२१ नंतर दाखल झालेल्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या जवळपास तिपटीने वाढली. उपचारांची औषधे, बेड, प्राणवायू, औषधांचा तुटवडा इत्यादी सर्वच आघाड्यांवर आरोग्य यंत्रणा लढत होती; पण अखेर आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नानंतर हे मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात यश आले. आता कोरोनाची तिसरी लाट आता दखल झाली असली, तरी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. लक्षणे आढळली असली, तरी ती सौम्य स्वरूपाची आहेत. बहुतेक रुग्ण सर्दी, खोकल्याचे सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या रुग्णांनी तपासणी केली, तर त्यापैकी बहुतांश लोकांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल न होता घरीच उपचार घेत आहेत. अशा रुग्णांची संख्या अंदाजे ८६ टक्के आहे. रुग्णालयात १८१ बाधित दाखल गेल्या ८ दिवसांत जवळपास दोन हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात आजच्या घडीला २०७० ॲक्टिव्ह रुग्ण असले, तरी १८१ जणांनाच रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलेले आहे. त्यापैकी २४ जण आयसीयूत दाखल आहेत. त्यातल्या १० जणांना व्हेण्टीलेटर्सची गरज भासत आहे; तर २० जणांना ऑक्सिजन लावण्यात आल्याची माहिती पालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. शून्य मृत्यू आठ दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला, तरी शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला शहरात मृत्यूचे थैमान सुरू होते. तशी परिस्थिती सध्यातरी नसल्याने आरोग्य यंत्रणेचा जीव भांड्यात पडला आहे. ४,१६६ खाटा सज्ज रुग्णांमध्ये सध्या सौम्य लक्षणे आढळत असली आणि बहुतेक बाधित घरीच उपचार घेत असले, तरी पालिकेने संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आपली तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार पालिकेची कोविड सेंटर्स आणि खासगी रुग्णालयात ४,१६६ बेड उपलब्ध आहेत. सर्वसाधारण रुग्णांसाठी ८९५, ऑक्सिजनच्या सुविधेसह २,७२३, आयसीयूचे ९७५ आणि व्हेण्टिलेटर्स असलेले ४०४ बेड उपलब्ध आहे. रुग्णसंख्या वाढली तर त्यांच्यावरील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा साठा पालिकेकडे उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com