टिळकनगर शाळेच्या सुमित्रा टिळक यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिळकनगर शाळेच्या सुमित्रा टिळक यांचे निधन
टिळकनगर शाळेच्या सुमित्रा टिळक यांचे निधन

टिळकनगर शाळेच्या सुमित्रा टिळक यांचे निधन

sakal_logo
By
सुमित्रा टिळक यांचे निधन डोंबिवली, ता. ४ ः टिळकनगर विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्येष्ठ माजी शिक्षिका डॉ. सुमित्रा टिळक यांचे पुणे येथील वृद्धाश्रमात सोमवारी (ता. ३) दुपारी १२.३० च्या सुमारास निधन झाले. काही काळ त्या अल्झायमर या आजाराने ग्रस्त होत्या. कविवर्य नारायण सुर्वेंच्या कवितांवर त्यांनी पी.एच.डी. केली होती. अत्यंत बुद्धिमान, परखड, कडक शिस्तीच्या टिळक बाई विद्यार्थ्यांच्या आदरस्थानी होत्या. अनेक वर्षे त्यांनी विवेकानंद केंद्राचे काम पाहिले होते. त्यांच्या निधनाने विद्यार्थी आणि शिक्षकवर्गावर शोककळा पसरली आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top