प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By
प्रीमियर सलमानचं लकी ब्रेसलेट! बॉलीवूडचा दबंग खान सलमानवर आतापर्यंत अनेक संकटं आली. त्यातील काही संकटं तर त्याने स्वतःहून ओढवून घेतली आहेत; परंतु त्यातून तो सहीसलामत वाचलेला आहे. अर्थात त्याचं नशीब चांगलंच जोरावर आहे. नशिबाने त्याला नेहमीच साथ दिली आहे. कोणाचे आशीवार्द असतील अन्यथा इतर काही; परंतु अनेक बाबतीत सलमान लकी ठरला आहे... अशीच काहीशी गोष्ट सलमानच्या हातातील ब्रेसलेटबाबत आहे. सलमानचं ब्रेसलेट नेहमीच त्याच्यासाठी लकी ठरलं आहे. सलमान ते कधीच हातातून काढत नाही. ते नेहमीच त्याच्याबरोबर असतं. एका मुलाखतीत त्याने त्याबाबत भाष्य केलं होतं. ब्रेसलेट आपल्यासाठी का लकी आहे, हेही त्याने सांगितलं होतं. माझ्या बाबांकडे असंच ब्रेसलेट होतं. तसंच एक त्यांनी मला दिलं. त्यामध्ये असलेल्या खड्यांमुळे नकारात्मक शक्ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही असं म्हणतात. त्यामुळे ते खूप लकी आहे, असं सलमानने स्पष्ट केलं. .... भारतात ‘स्पायडर मॅन’चा २६० कोटींचा गल्ला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सुपरहिरो ‘स्पायडर मॅन’चे करोडो चाहते आहेत. नुकताच ‘स्पायडर मॅन नो वे होम’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता टॉम हॉलंडचा स्पायडर मॅन म्हणून तो तिसरा सोलो अॅडव्हेंचर चित्रपट आहे. त्यात बेनेडिक्ट कंबरबॅच यांनी डॉक्टर स्ट्रेन्ज आणि झेंडया एमजेने पीटर पार्करची गर्लफ्रेंड म्हणून काम केलं आहे. अॅक्शन-रोमान्स असा सबकुछ मसाला चित्रपटात आहे. कोरोना काळात आलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. स्पायडर मॅनचे चाहते असंख्य असल्याने ते पुनःपुन्हा चित्रपट पाहत आहेत. १७ डिसेंबर रोजी तो जगभरात प्रदर्शित झाला आणि आतापर्यंत त्याने चांगलीच कमाई केली आहे. खरे तर कोरोनामुळे चित्रपट पाहायला कितीसे प्रेक्षक येतील अशी शंका होती, परंतु चित्रपटाने सगळ्या शंका-कुशंका दूर केल्या... केवळ भारतात आतापर्यंत त्याने २६० कोटींची बक्कळ कमाई केली आहे. विशेष म्हणजे आजही तो चांगली गर्दी खेचतोय. त्यामुळे त्याची कमाई ३०० कोटींच्या पार जाईल असं बोललं जातंय. ... ‘गुल्हर’चं अनोखं पोस्टर काही मराठी चित्रपटांची नावं अशी असतात, की त्यामुळे त्याबद्दल उत्सुकता अधिक ताणली जाते. आता लाँच झालेल्या ‘गुल्हर’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरबाबतही तसंच काहीसं म्हणता येईल. ‘गुल्हर’च्या मोशन पोस्टरची सुरुवात आयडियल व्हेंचर आणि आर. के. फिल्मस प्रस्तुत नावापासून होते. उत्सुकता वाढवणाऱ्या पार्श्वसंगीतासह मोशन पोस्टर पुढे सरकतं. त्यानंतर एक कोरा फळा समोर येतो, ज्यावर ‘गोष्ट एका उनाड मनाची’ अशी टॅगलाईन दिसते. मागोमाग ‘गुल्हर’ असं चित्रपटाचं टायटल येतं. अचानक असं काही तरी घडतं, की फळा असलेली भिंतच तुटते. सोबत त्या फळ्यालाही तडा जातो. नेमकं काय घडतं... असं कुतूहल निर्माण करणारं पोस्टर आहे. एका ११ वर्षांच्या मुलाच्या दृष्टिकोनातून चित्रपटाची कथा सांगण्यात आली आहे. शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे आणि अबिद सय्यद यांनी आयडियल व्हेंचर आणि आर. के. फिल्मच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे. रमेश चौधरी दिग्दर्शक आहेत. चित्रपटात विनायक पोद्दार, रवी काळे, भार्गवी चिरमुले, सुरेश विश्वकर्मा, माधव अभ्यंकर, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. .... ‘स्टोरी ऑफ लागिरं’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला प्रेमकथेवर आधारित असलेला ‘स्टोरी ऑफ लागिरं’ चित्रपट १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला रसिकांची चांगली पसंती मिळाली आहे. प्रेम, राजकारण, गावातील हेवेदावे, तीव्र सत्तासंघर्ष वगैरे अनेक पदर चित्रपटाच्या कथेला असतील, असा अंदाज ट्रेलरमधून व्यक्त करण्यात आला आहे. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत रॉयल समृद्धी असोसिएट्स आणि स्वरूप सावंत. जी. के. फिल्मस् क्रिएशसन व मिडियावर्कस् स्टुडिओने निर्मिती केली आहे. बी. एन. मेश्राम चित्रपटाचे निर्माते व यामिनी वाघडे सहनिर्मात्या आहेत. रोहित राव नरसिंगे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे, मोहन जाधव, सोमनाथ येलनुरे आदींसह अभिनेते संजय खापरे, मिलिंद दास्ताने आणि प्रेमा किरण अशा काही अनुभवी कलाकारांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ... तनिष्का विवाहबंधनात? अभिनेत्री काजोलला जेवढी प्रसिद्धी किंवा स्टारडम मिळालं तेवढं तिची बहीण तनिष्का मुखर्जीला मिळालं नाही. तिचे चित्रपट कधी आले आणि गेले ते समजलंच नाही. ती ‘बिग बॉस’च्या चौदाव्या सिझनमध्येही होती. त्यानंतरच तिची चर्चा सुरू झाली. ‘बिग बॉस’च्या घरात तिच्या आणि अरमान कोहलीच्या नातेसंबंधांची चर्चा जोरात सुरू होती. सोशल मीडियावर नेहमी काही तरी पोस्ट करण्याच्या सवयीमुळे तिने आता असाच एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांची उत्सुकता वाढली. समुद्रकिनाऱ्यावरचा तो फोटो एका चाहत्याने निरखून बघत त्यावर कमेंट केली आहे, गुपचूप लग्न केलं का? त्याच्या कमेंटवरून सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे. लग्न कोणाशी झालं असेल इथपासून ते कधी झालं, असे अनेक प्रश्न चाहते तिला विचारत आहेत. तिच्या एका फोटोमुळे ती विवाहित असल्याचं दिसून येत आहे. तिने गुपचूप लग्न केल्याचं बोललं जातंय. आता खरं काय ते तनिष्काच जाणो. .... काजलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन अभिनेत्री काजल अग्रवालने साऊथसह बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. २०२० मध्ये तिने उद्योगपती गौतम किचलूशी लग्न केलं. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांनी चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रेग्नन्सीच्या चर्चांवर अखेर त्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे २०२२ मध्ये दोघंही आपल्या नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहेत. गौतमने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काजलचा एक फोटो शेअर केला. ‘२०२२ तुमची वाट पाहत आहे’ अशी हट के कॅप्शन त्याने दिली आहे. त्यासोबत त्यांनी एका गर्भवती महिलेचा इमोजी टाकला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रेग्नन्सीच्या चर्चा खऱ्या असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांच्या फोटोवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top