वसईत आरोग्य शिबिराला प्रतिसाद

वसईत आरोग्य शिबिराला प्रतिसाद

वसईत आरोग्य शिबिराला प्रतिसाद विरार, ता. ४ (बातमीदार) ः मानव उत्थान सेवा समिती आणि डिव्हाईन लाईट मिशन आणि एचसीजी कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने वसई पूर्वेतील श्री हंस विजयनगर आश्रम येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात जनरल फिजिशियन डॉ. पूनम चौहान, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. शोभित देशमुख, राजेश सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांकडून एकूण ११७ जणांना प्रथमोपचार व योग्य समुपदेशन करण्यात आले. या शिबिरात भाजपच्या सदस्या सविता सिंह आणि शिवसेनेचे विनायक निकमही उपस्थित होते. खासदार राजेंद्र गावित यांनीदेखील या शिबिराला भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com