भाईसाहब मेहरवान सिंग उद्यानाचे उद्घाटन
खासदार डॉ. शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) ः कॅम्प नंबर ३ हिराघाट चौकाजवळील मोकळ्या जागेत महापालिकेने भाईसाहब मेहरवान सिंग उद्यान विकसित केले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या उद्यानाचे लोकार्पण केले आहे. यासाठी त्यांनी एक कोटीचा निधी दिला आहे. या निधीतून या उद्यानाला ऐतिहासिक झळाळी मिळेळ अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक अनेक वर्षांपासून हे उद्यान दुर्लक्षित ठेवण्यात आल्याने त्याची अवस्था बिकट झाली होती. भूमाफियांचा त्यावर डोळा होता. हे बघून आणि या परिसरात एकही उद्यान नसल्याने साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला. ५० लाखांच्या निधीतून उद्यानाचे सुशोभीकरण करून उद्यान नागरिकांसाठी खुले केले; मात्र या उद्यानासाठी बराच खर्च येत असल्याने जीवन इदनानी यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे एक कोटीच्या निधीची मागणी केली होती. डॉ. शिंदे यांनी उद्यानाला निधी उपलब्ध करून दिला. उद्घाटनप्रसंगी महापौर लीलाबाई आशान, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, भाईसाहब जसकिरत सिंग, त्रिलोक सिंग, माजी महापौर आशा इदनानी, विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे, नगरसेवक धनंजय बोडारे, राजेंद्रसिंह भुल्लर, कलवंतसिंग सोहता, विजय पाटील, किशोर वनवारी, नगरसेविका इंदिरा उदासी उपस्थित होते.