‘जॉय’च्या निबंध स्पर्धेचा निकाल घोषित

‘जॉय’च्या निबंध स्पर्धेचा निकाल घोषित

‘जॉय’च्या निबंध स्पर्धेचा निकाल घोषित अभिजित अहिरे प्रथम; बकुल बोरकर द्वितीय मालाड, ता. ५ (बातमीदार) ः जॉय सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात अभिजित अहिरे यांना प्रथम, बकुल बोरकर यांना द्वितीय, तर संजय जोशी नाशिक तृतीय क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ म्हणून रूपाली कांबळे व शुभंगी गुरव निवड झाली. जॉयच्या एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याचे जॉयचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी कळविले आहे. नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून जॉयतर्फे दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून २०२१ या वर्षात राखी स्पर्धा, भेटकार्ड तयार करणे, वृत्तपत्र लेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा आदींचे आजोयन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेसाठी रुता रानडे, शिवाजी कुलाल,भाग्यश्री रावले, फिलिप रोड्रिक्स, गणेश हिरवे आदी मान्यवरांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com