केळवे भुईकोटाला मिळाला मोकळा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळवे भुईकोटाला मिळाला मोकळा श्वास
केळवे भुईकोटाला मिळाला मोकळा श्वास

केळवे भुईकोटाला मिळाला मोकळा श्वास

sakal_logo
By
केळवे भुईकोट किल्ल्याने घेतला मोकळा श्वास स्वच्छता मोहिमेत दुर्गप्रेमींचा सहभाग वसई, ता. ५ (बातमीदार ) ः माहीम केळवे भुईकोट विजयदिनाचे २८४ वे वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने केळवे भुईकोटचे संवर्धन व्हावे, याकरिता किल्ले वसई परिवाराने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत केळवे कस्टम कोटची स्वच्छता करण्यात आली. या वेळी दुर्गप्रेमींनी सहभाग घेतला होता. पुढच्या मोहिमेत केळवे कोट दारूबंदी, प्रवेशद्वार सुशोभीकरण, माहिती फलक लावणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. सध्या केळवे भुईकोटच्या आतील जमा झालेली वाळू उपसण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ, महिला आदींनी यात सहभाग घेतला. दरम्यान, नियोजनबद्ध काम करण्यासाठी इतर काही संस्थांना आपला सहभाग नोंदवायचा असेल तर त्यांनी किल्ले वसई मोहीम परिवार, संवर्धन मोहीम केळवे, केळवे पर्यावरण संवर्धन मंडळ यांना संपर्क करावा, असे आवाहन या वेळी इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी केले आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top