धारावी स्मशानभूमीची दुरवस्था

धारावी स्मशानभूमीची दुरवस्था

धारावी स्मशानभूमीची दुरवस्था धारावी, ता. ५ (बातमीदार) : धारावीतील हिंदू स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीत येणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची गैरसोय, अस्वच्छ शौचालय आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्यांसाठी बसण्याची सोय हॉलमध्ये करण्यात आली आहे. या ठिकाणी विजेची सोय केली गेली आहे. पंखे नाहीत. यामुळे या हॉलचा फायदा होत नाही. हॉलमध्ये गरम होत असल्याने बाहेर उभे राहावे लागत आहे. आसनव्यवस्था जागोजागी तुटलेली आहे. हॉलला असलेले शटर तुटलेले आहे. शौचालयात दुर्गंधी पसरली आहे. शौचालय अस्वच्छ असल्याने त्याचा वापर करणे अशक्य झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी उभारण्यात आलेली पाणपोई बंद आहे. एकाच ठिकाणी असलेल्या नळावर हात-पाय धुणे, तसेच अन्य धार्मिक विधी उरकावे लागत आहेत. पालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com