वर्षभरात रेल्वे अपघातात १४६ जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षभरात रेल्वे अपघातात १४६ जणांचा मृत्यू
वर्षभरात रेल्वे अपघातात १४६ जणांचा मृत्यू

वर्षभरात रेल्वे अपघातात १४६ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
वर्षभरात रेल्वे अपघातात १४६ जणांचा मृत्यू गतवर्षीच्या तुलनेत रेल्वे अपघातांत वाढ वाशी, ता. ५ (बातमीदार) ः ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर वाशी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत गतवर्षी १४६ जणांनी आपले प्राण गमावले होते. त्यात सर्वाधिक मृत्यू रूळ ओलांडताना रेल्वेची धडक लागून झाले आहेत. २०२० या वर्षात घडलेल्या अपघातांमध्ये ६५ प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्न करताना झाले आहेत. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे करण्यात आलेल्‍या लॉकडाऊनमुळे व रेल्वे कमी प्रमाणात असल्यामुळे अपघात कमी झाले. रेल्वे रूळ ओलांडण्यावर प्रतिबंध असतानाही शॉर्टकटच्या प्रयत्नात प्रवाशांकडून जीव मुठीत घेउन रूळ ओलांडले जात आहेत. नवी मुंबईत ट्रान्स हार्बर, तसेच हार्बर रेल्वेमार्गाभोवती सुरक्षा भिंत बांधण्यात आली आहे. मात्र तरीही प्रवाशांकडून जागोजागी रेल्वे रूळ ओलांडण्याचे शॉर्टकट तयार झाले आहेत. स्थानकाचा प्रवेशद्वार मार्ग न वापरता थेट फलाटावर ये-जा करण्यासाठी अथवा रुळाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जीव धोक्यात घातला जातो. अशा ठिकाणावरून रेल्वे प्रवाशांकडून दिवस-रात्र रूळ ओलांडले जात असल्‍याने रेल्वेची धडक लागून प्रवासी मृत्यू होण्याचे अथवा जखमी होण्याचे प्रकार घडतात. त्याप्रमाणे गर्दीच्या वेळी लटकत प्रवास केल्याने पडून अनेकांचा मृत्‍यू होतो. त्यामुळे रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांसह प्रवाशांनीही विशेष खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. रेल्वे पोलिसांची नजर चुकवून घेणारा शॉर्टकटही जिवावर बेतत आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते ऐरोली व सीबीडी ते पनवेल दरम्यान १४६ जणांचे अपघाती निधन झाले आहे. त्यामुळे रूळ ओलांडताना ११९ तर गाडीतून पडून २७ जणांचे प्राण गेले आहे. त्याशिवाय १९ मृतदेह रेल्वे रुळालगत आढळले असून त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वाशी रेल्वे पोलिस ठाणे हद्दीत मानखुर्द ते वाशीदरम्यान सर्वाधिक अपघात घडले आहेत. अनेकदा रेल्वे रुळावर देखील मृतदेह आढळून येतात. त्यांचा मृत्यू अपघाती की नैसर्गिक याचा उलगडा रेल्वे पोलिसांना करावा लागतो. अनलॉक होताच अपघात सुरू २०२० मध्ये लॉकडाऊन लागताच रेल्वेसेवा ठप्प झाल्याने रेल्वे अपघातही बंद झाले होते. मात्र गतवर्षी टप्प्याटप्प्याने रेल्वे पुन्हा सुरू होताच अपघाताच्याही घटनाही वाढू लागल्‍या. चौकट वर्ष मृत्यू २०२१ १४६ २०२० ६५ २०१९ २४७ २०१८ २५१ चौकट २०२१ मधील अपघात रेल्वे रूळ ओलांडणे - ११९ गाडीतून पडून - २७ नैसर्गिक - १९ एकूण - १६५
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top