तळा नगरपंचायतीत चार प्रभागात १८ उमेदवार वैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळा नगरपंचायतीत चार प्रभागात १८ उमेदवार वैध
तळा नगरपंचायतीत चार प्रभागात १८ उमेदवार वैध

तळा नगरपंचायतीत चार प्रभागात १८ उमेदवार वैध

sakal_logo
By
तळा नगरपंचायतीत चार प्रभागांत १८ उमेदवार वैध तळा, ता. ५ (बातमीदार) : तळा नगरपंचायत निवडणुकीत चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्या उमेदवारी अर्जांची छाननी ४ जानेवारीला झाली. त्यात १८ उमेदवार वैध ठरले असून ८ उमेदवार अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली आहे. १८ उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, शेकाप, अपक्ष यांच्यात लढती होणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नक्की कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे स्पष्ट होईल. राजकीय हालचालींना जोरदार सुरुवात झाली आहे. अंतर्गत प्रचार सुरू आहे. ही निवडणूक चार प्रभागांत लढविताना सर्वच पक्षांना येथे ताकद लावावी लागणार आहे. संपूर्ण तळावासीयांचे या चार लढतींकडे लक्ष लागून राहिले आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top