ऐरोली ते काटई नाका रस्त्यावर नवी मुंबईला मार्गीका

ऐरोली ते काटई नाका रस्त्यावर नवी मुंबईला मार्गीका

ऐरोली ते काटई नाका रस्त्यावरून मार्गिका नवी मुंबई महापालिका एमएमआरडीएला जागा देणार सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. ५ : एमएमआरडीएतर्फे ऐरोली ते काटई नाका या मार्गावर नवी मुंबईला जोडणारी एक मार्गिका देण्यात येणार आहे. महापालिकेने त्याकरीता एमएमआरडीएला पर्यायी जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई आणि नवी मुंबईतून कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करताना घ्यावा लागणारा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी ऐरोली-काटई नाका अशा उन्नत आणि भूमिगत मार्गाची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहे. या रस्त्याचे काम गतीमानतेने सुरू असून नवी मुंबई पालिका क्षेत्रातील ठाणे बेलापूर मार्गावर सेक्टर ३ ऐरोली येथील पालिकेकडे हस्तांतरीत असलेल्या जागांमधील प्रकल्पासाठी एमएमआरडीएला आवश्यक असणाऱ्या जागा उपलब्ध करून देणेबाबत या बैठकीत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सेक्टर ३ ऐरोली येथील उद्यानाचा काही भाग, अग्निशमन केंद्र परिसराचा काही भाग तसेच ऐरोली बस डेपोचा काही भाग उपलब्ध करून देण्यास व काम झाल्यानंतर तो पूर्ववत करण्याचे एमएमआरडीएमार्फत मान्य करण्यात आले. नवी मुंबईकर नागरिकांना या पूलाचा वापर करता यावा याकरिता ठाणे बेलापूर रोडवरून कल्याण-डोंबिवलीकडे जाण्यासाठी व कल्याण डोंबिवलीकडून ठाणे बेलापूर रोडवरून नवी मुंबईत उतरण्यासाठी एमएमआरडीएच्या नियोजनात मार्गिका उपलब्ध आहेत. यामध्ये ठाणे बेलापूर रोडवरून मुलुंडमार्गे मुंबईत जाण्यासाठी व मुलुंडकडून ठाणे बेलापूर रोडवर नवी मुंबईत येण्यासाठी आवश्यक असलेली मार्गिका एमएमआरडीएमार्फत नवीन नियोजनात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या कार्यवाहीची कालमर्यादा निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत एमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता विनय सुर्वे व गुरुदत्त राठोड, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय खताळ तसेच प्रकल्प सल्लागार आकार अभिनव कन्सल्टन्टचे व्यवस्थापकीय संचालक अमोल खेर, वरिष्ठ उपाध्यक्ष दिपक शेंडे व महाव्यवस्थापक किशोर कोटकर उपस्थित होते. --------------------------------- एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेणार या मार्गिकांची तांत्रिक व्यवहार्यता तपासून १५ जानेवारीपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आयुक्तांमार्फत प्रकल्प सल्लागार यांना सूचित करण्यात आले तसेच याविषयी पुन्हा १८ जानेवारीला एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर पुढील कार्यवाही निश्चित करण्याकरिता एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी यांचे स्तरावर बैठक आयोजनाबाबत विनंती करण्यात येणार आहे. तसेच ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतुक विनाअडथळा व्हावी याकरिता भविष्यात भारत बिजली जंक्शनजवळ उन्नत मार्गावर उड्डाणपूल बांधण्यातील अडचणी तपासणे व तांत्रिक अहवाल तपासणी करणेविषयी प्रकल्प सल्लागार यांना आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com