वजनी सीएनजीचा वाहतुकदारांना चटका

वजनी सीएनजीचा वाहतुकदारांना चटका

वजनी सीएनजीचा वाहतुकदारांना चटका सीएनजीमध्ये एलपीजीची भेसळ होत असल्याचा वाहन चालकांचा आरोप दीपक घरत, सकाळ वृत्तसेवा पनवेल, ता. ५ : सीएनजी गॅसमध्ये भेसळ करण्यात येत असल्याच्या तक्रारीत सध्या वाढ होत आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी पंप मालक सीएनजीत वजनाने सीएनजीपेक्षा जास्त असलेल्या एलपीजीची भेसळ करत असल्याचा आरोप तक्रारदरांचा आहे. सीएनजी पंप मालक मात्र हा आरोप फेटाळत असून रिच गॅसमुळे सीएनजी गॅसच्या वजनात वाढ होत असल्याची माहिती सीएनजी पंप मालक देत आहेत. पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वैतागलेल्या नागरिकांकडून सीएनजीवर चालणारी वाहने खरेदी करण्याला पसंती देण्यात येत आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी सीएनजीच्या दरात देखील वाढ करण्यात आली असून, अनेकदा इंधन टाकीच्या क्षमतेपेक्षा जास्त सीएनजी इंधन टाकीत बसत असून देखील मायलेज मात्र कमीच मिळत असल्याने खिशाला कात्री लागल्याने वाहन चालक सीएनजीमध्ये भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी करून भेसळ करणाऱ्या पंप चालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे पंप मालक मात्र सीएनजी वाहन चालक करत असलेले आरोप फेटाळत असून महानगर गॅसकडून गॅस वाहणीतून पुरवण्यात येणाऱ्या सीएनजीत कोणत्याही प्रकारची भेसळ करणे शक्य नसल्याचे सांगत, महानगर गॅसकडून पुरवण्यात येणाऱ्या सीएनजी गॅसमध्ये मिसळलेल्या रिच गॅसमुळे सीएनजी वजन वाढत असल्याची माहिती देत आहेत. ....... रिच गॅस म्हणजे काय? नैसर्गिक वायूवर दाब देऊन सीएनजी तयार करतात. असा दाब दिल्याने नैसर्गिक वायूचे घनफळ खूप कमी होते. या प्रक्रियेतून तीन प्रकारचे गॅस मिळतात पाहिला सीएनजी दुसरा पीएनजी तर तिसरा एलपीजी. सीएनजीचा वास येत नसल्याने अनेकदा गॅस वाहिनीतून होणारी गळती कळत नाही, हे लक्षात यावे यासाठी ऐका प्रकारचे रसायन गॅसमध्ये मिसळण्यात येते. यामुळे गॅसचे वजन काही प्रमाणात वाढते. या वाढलेल्या वजनाच्या गॅसला रिच गॅस असे संबोधले जाते. फलक अपेक्षित ---- ज्या वेळी पंपात रिच गॅस वाहिनीतून येत असतो. त्या वेळी पंपाच्या बाहेर सीएनजी पंप मालकांनी रिच गॅस येत आहे असा फलक लावणे अपेक्षित असते. कोट ---- सीएनजी गॅसमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ केली जाणे शक्य नाही. पंप चालक देखील आशा प्रकारे कोणतीही भेसळ करू शकत नाहीत. - नीरा आस्थाना, महानगर गॅस,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com