कोरोना बाधित रुग्ण संख्येबरोबर सक्रिय रुग्णही वाढले

कोरोना बाधित रुग्ण संख्येबरोबर सक्रिय रुग्णही वाढले

कोरोनाबाधित रुग्ण संख्येबरोबर सक्रिय रुग्णही वाढले ठाण्यात सक्रिय रुग्णांची संख्या झाली १४ हजार पार सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ६ ः गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी ही संख्या सात हजार झाल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येने १४ हजारांचा आकडा पार केला आहे. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून २२७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. एकाच दिवशी ठाणे आणि नवी मुंबईत प्रत्येकी दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे; तर कल्याण-डोंबिवलीत १२०० च्या आसपास रुग्ण वाढले आहेत. ठाणे जिल्ह्यात गुरुवारी सात हजार ७३ रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत नोंदणी झालेल्या रुग्णांचा आकडा पाच लाख ९५ हजार ७० झाला आहे; तर २२७ जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण पाच लाख ६० हजार ५६० नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांच्या मृत्यूने कोरोनाने झालेल्या मृत्यूची संख्या ११ हजार ६२४ झाली आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा १४ हजार ५५ वर पोहोचला आहे. ठाणे महापालिका हद्दीत दोन हजार १८० रुग्ण सापडले असून एक जण दगावला आहे; तर सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार ९९४ झाली आहे. नोंदणी झालेल्या एक लाख ५० हजार ६४० रुग्णांपैकी एक लाख ४० हजार ६७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. केडीएमसीत एक हजार १७२ रुग्ण आढळले असून येथे सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार ९२६ वर गेली आहे. नवी मुंबईत दोन हजार १५१ रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही येथे चार हजार ६८५ झाली आहे; तर एकाचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगर मध्ये २३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ३८४ झाली आहे. भिवंडीत ६९ रुग्णांची नोंदणी झाली असून सक्रिय रुग्णसंख्या ११५ आहे; तर मिरा-भाईंदरमध्ये ६३२ रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्णसंख्या ही दोन हजार ३६ वर पोहोचली आहे. अंबरनाथमध्ये १७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून एकूण १९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कुळगाव बदलापूरमध्ये १६१ रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये एकाच दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० झाली असून ५७९ रुग्ण ॲक्टिव्ह असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com