लस निर्मितीसाठी हाफकीनमध्ये बीएसएल प्रयोगशाळेची प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लस निर्मितीसाठी हाफकीनमध्ये बीएसएल प्रयोगशाळेची प्रक्रिया सुरू
लस निर्मितीसाठी हाफकीनमध्ये बीएसएल प्रयोगशाळेची प्रक्रिया सुरू

लस निर्मितीसाठी हाफकीनमध्ये बीएसएल प्रयोगशाळेची प्रक्रिया सुरू

sakal_logo
By
हाफकिनमध्ये बीएसएलची निर्मिती सुरू लस बनविण्यासाठी महत्त्वाचे योगदान ठरणार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ७ : कोरोना प्रतिबंधक लशींचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीसोबत तंत्रज्ञान हस्तांतरण करार केला आहे. यानुसार लसनिर्मितीसाठी हाफकिन बायोफार्माला मान्यता दिली होती. या लशीच्या निर्मितीसाठी बीएसएल (जैविक सुरक्षा प्रयोगशाळा) उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत लॅब उभारणी आणि चाचणीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात राज्य सरकारच्या मालकीच्या हाफकिन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लस निर्मितीसाठी मान्यता देण्यात आला होती. यानंतर हाफकिन लसनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी झाला. हाफकिनच्या उत्पादन विभागाचे महाव्यवस्थापक सुभाष शंकरवार यांनी सांगितले की, कोणत्याही लसनिर्मितीसाठी सुरक्षा प्रयोगशाळेची गरज असते. ही प्रयोगशाळा आयसीएमआर आणि हाफकिनच्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तयार केली जाईल. या प्रयोगशाळेच्या उभारणीची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच त्याचे बांधकाम पूर्ण होईल. बीएसएल लॅबचे बांधकाम पूर्ण झाल्यावर महिनाभर त्याची चाचणी केली जाईल. या चाचणीमध्ये शास्त्रज्ञ तपासतील की लॅब एसओपी अंतर्गत बनवली गेली आहे की नाही, लस तयार करण्यासाठी प्रयोगशाळा कितपत सुरक्षित आहे. प्रयोगशाळेच्या निर्मितीनंतर लस तयार केली जाईल. या लशीची तीन महिने चाचणी केली जाणार आहे. या चाचणीत लशीत दोष आहेत की नाही, असतील तर ते कोणते, हे दिसून येईल. या तपासणीत सकारात्मक परिणाम आल्यास लशीचे उत्पादन सुरू केले जाईल आणि त्यानंतर ती बाजारात आणली जाईल, असे शंकरवार यांनी सांगितले. कोट कंपनीने एका वर्षात कोव्हॅक्सिनचे २२.८ कोटी डोस तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या लसनिर्मितीची प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर बाजारात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. लसनिर्मितीसाठी सरकारकडून अनुदान मिळाले आहे. - डॉ. संदीप राठोड, व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायोफार्मा
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top