Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteSakal Digital

सदावर्तेने एसटी संपातील कोटी रुपयांचा हिशोब द्यावा!

Summary

संपकऱ्यांच्या पैशांचा हिशोब द्यावा शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांचे ॲड. सदावर्ते यांना आव्हान

सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ७ : मुख्यमंत्री आजारी असल्याने राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या पगारात कपात केली का, असा सवाल संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता. त्याला शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रतित्त्युर देत एसटी कर्मचाऱ्यांकडून संघर्षाच्या नावाखाली भरमसाठ वर्गणी गोळा केली, त्याचा हिशोब कोण देणार, असा सवाल केला.

मुख्यमंत्र्यांच्या पगाराचा हिशोब मागण्यापूर्वी संपातील कर्मचाऱ्यांच्या वर्गणीचा हिशोब द्यावा, असे आव्हान कायंदे यांनी केले आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. ते त्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत. सदावर्ते मुख्यमंत्र्यांच्या पगाराबाबत चर्चा करत आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या वर्गणीबाबत काहीही बोलत नाहीत. संघर्षाच्या नावाखाली गोळा केलेल्या वर्गणीचा हिशोब त्यांनी द्यावा. मुख्यमंत्री हे नोकरी करत नसून ठाकरे कुटुंबाची चौथी पिढी राजकारण आणि समाजकारणामध्ये आहे. ते पगारासाठी काही करत नाहीत, असे त्यांनी म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com