Mumbai Fire
Mumbai Firesakal

भिवंडीत रात्रभरात आगीच्या तीन घटना; दोन कामगार जखमी

दोन कामगार जखमी; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दोन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तीन ठिकाणी भीषण आग (fire in Bhiwandi) लागल्याची घटना घडली आहे. यात दोन कामगार गंभीर (two workers injured) जखमी झाले आहेत. त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या (Fire brigade team) जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. (Three fire incident in Bhiwandi two workers injured)

Mumbai Fire
मुंबईतील रूग्णसंख्या पुन्हा 20 हजार पार; सहा जणांचा मृत्यू

आगीसंदर्भात पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. मात्र, तिन्ही ठिकाणच्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गुरुवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भिवंडी-ठाणे महामार्गावरील दापोडा ग्रामपंचायत क्षेत्रात कापडी मोजे बनविणाऱ्या कारखान्यास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास याच भागात मानस पेट्रोल पंपाजवळ पारसनाथ कॉम्प्लेक्समधील एका भंगाराच्या गोदामाला आग लागली होती.

घटनास्थळी ठाणे अग्निशमन दलाचे जवान दाखल होत त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आज सकाळी ८.३० वाजता पूर्णपणे विझविली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरीकडे आज पहाटेच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावर वडपे ग्रामपंचायत हद्दीत एका फर्निचर बनविणाऱ्या लाकूड कंपनीमध्ये आग लागण्याची घटना घडली. ब्लू-डार्ट कंपनीच्या मागे असलेले मेहेन्दी हसनसई चौधरी यांच्या मालकीच्या प्लायवूड व लाकडी ओंडक्याच्या दुकान गाळ्याला ही आग लागली होती.

यावेळी गोदामात झोपलेले रिंकूराज नारायण (वय २४ ), राजगौतम विश्वकर्मा (वय २२) हे दोन कामगार अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोन्ही कामगारांना बाहेर काढले. ते दोघेही आगीत भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भिवंडीतील इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सकाळी कळवा येथील रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. ५ तासांनंतर आग आटोक्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com