छान दिसण्यात गैर काय?

छान दिसण्यात गैर काय?

छान दिसण्यात गैर काय? मॅचिंग मास्कवरून महापौरांचा सवाल सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ७ : कोविडमुळे मास्क हा आता जीवनशैलीचा भाग झाला आहे; मात्र कपड्यांना मॅचिंग मास्क वापरणेदेखील फॅशनचा हिस्सा झाला आहे. त्याला मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकरही अपवाद नाहीत. ‘वय वाढलं म्हणून काय झालं, सुंदर आणि छान दिसण्यात गैर काय?’, असा रोखठोक सवाल महापौर पेडणेकर यांनी केला. ‘माझा मास्क तीन लेअरचा आहे. त्यामुळे तो वापरण्यास हरकत नाही. महिला असल्याने माझ्यात सुप्त गुण आहेत, अशी पुष्टीही महापौरांनी जोडली. कोविडमुळे सर्वांनाच मास्क लावून घराबाहेर पडावे लागत आहे. बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या मास्कसह डिझायनर मास्कही उपलब्ध आहेत. कपड्यांच्या दुकानात मॅचिंग मास्कही विक्रीस आहे. सामान्य नागरिकांपासून राजकारण्यांचेही डिझायनर मास्कने लक्ष वेधून घेतले आहे; मात्र या डिझायनर मास्कच्या फॅशनवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार, तीन लेअरचा मास्क वापरणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी ठणकावले होते. अजित पवारांनी डिझायनर मास्क वापरण्याच्या फॅशनवर व्यक्त केलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर महापौरांना त्यांच्या डिझायनर मास्कबद्दल विचारले. त्यावर त्यांनी हा मास्क तीन लेअरचा असल्याचे आवर्जून नमूद केले. अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे माझा मास्क तीन लेअरचा आहे. तसेच तो कॉटनचा असल्याने श्वसनालाही योग्य आहे, असेही महापौरांनी नमूद केले. ---- मी सर्वसामन्यांची प्रतिनिधी एन-९५ हा मास्क तुलनेने महाग आहे. तो सर्वसामान्यांना परवडणार नाही. मी सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे त्यांना काय परवडेल, याचे उदाहरण दिल्यास त्याचा अवलंब ते करतील, असेही महापौरांनी यावेळी सांगितले. ------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com