म्हाडा कॉलनीमधील रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडा कॉलनीमधील रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा
म्हाडा कॉलनीमधील रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

म्हाडा कॉलनीमधील रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

sakal_logo
By
म्हाडा कॉलनीमधील रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनीमधील रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. साईनाथ चौक येथील रस्ता खूपच खराब झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासातून जावे लागत आहे. म्हाडा कॉलनीमधील रहिवाशांनी म्हाडा रेसिडेंट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रवी नाईक यांच्याकडे खराब रस्ता आणि खड्ड्यांबाबत तक्रार केली. त्यांनी महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिले. म्हाडा प्राधिकरणालादेखील याबाबत सविस्तर माहिती दिली. अलीकडेच साईनाथ चौक येथील रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना नाईक म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून म्हाडा कॉलनीमधील नागरिक साईनाथ चौकातील खराब रस्त्यावरून मार्गक्रमण करत होते. चौकातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मी म्हाडा प्राधिकरण आणि महापालिका यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यावर तोडगा निघाला असून रस्त्याच्या दुरुस्तीची वर्क ऑर्डरदेखील पालिका प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top