अडीच लाखांचा ऐवज चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनिषा नगर, कळवा या भागात घराचे लॉक अज्ञात चोराने तोडून घरात प्रवेश केला. शुक्रवारी (ता. ७) दुपारी १ च्या सुमारास घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा दोन लाख ३४ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
-----
फेरीवाल्याला अमेरिकन डॉलरचे प्रलोभन दाखवून फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ५० हजार यूएस डॉलरचे प्रलोभन दाखवून ठाण्यातील एका फेरीवाल्याच्या बॅंक खात्यामधून दोन लाख २६ हजार रुपये घेऊन अज्ञाताने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
ठाण्यातील घोडबंदर, मानपाडा परिसरातील फिर्यादी फेरीवाल्याला अज्ञाताने फेसबुक व व्हॉट्सअॅपवर मेसेज टाकून कोरोनामुळे एका व्यावसायिकाच्या झालेल्या नुकसान भरपाईच्या मोबदल्यात ५० हजार यूएस डॉलरचे प्रलोभन दाखवले होते. त्यानंतर हे पैसे हवे असतील तर तुमच्या खात्यामधून दोन लाख २६ हजार एवढी रक्कम वळती करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी ५० हजार यूएस डॉलर मिळणार, या अपेक्षेने २ डिसेंबर २०२१ रोजी ही रक्कम ट्रान्स्फर केली; मात्र त्यांना काही रक्कम मिळालीच नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी शुक्रवारी (ता. ७) चितळसर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.