सुहाना खान करते आहे या स्टारकिड्ला डेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुहाना खान करते आहे या स्टारकिड्ला डेट
सुहाना खान करते आहे या स्टारकिड्ला डेट

सुहाना खान करते आहे या स्टारकिड्ला डेट

sakal_logo
By
सुहाना खान करते आहे या स्टारकिडला डेट बॉलीवूडचा किंग शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनते. सुहानाने अद्याप बॉलीवूडमध्ये एन्ट्री केलेली नाही. मात्र तरीही तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या सुहानाच्या लव्ह लाईफची चर्चा रंगली आहे. सुहाना खान एका बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तिचा या स्टारकिडसोबतचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी ती या स्टारकिडला डेट करत असल्याचे म्हटले आहे. सुहाना ही बॉलीवूड अभिनेते चंकी पांडे यांच्या घरची सून होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ती अहान पांडेला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. सुहानाने अनेकदा अहान पांडेसोबतचे फोटो शेअर केले आहेत. मात्र दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top