मुंबई
शंभरातील सातवा बाधित
मुंबईत २२ महिन्यांत सात टक्के बाधित
आजवर आठ लाख ७४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची शहरात नोंद झाल्यानंतर आजवर आठ लाख ७४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यातील सुमारे सात टक्के नागरिकांना गेल्या २२ महिन्यांत कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या सात दिवसांत पॉझिटीव्हीटी दर दुप्पट झाला आहे.
११ मार्च २०२० मध्ये मुंबईत पहिला कोविडचा रुग्ण आढळला. त्यानंतर ७ जानेवारीपर्यंत आठ लाख ७४ हजार ७८० बाधितांची नोंद झाली आहे. त्यातील १६ हजार ३९४ रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे. शहरातील मृत्युदर नियंत्रणात आणण्यात यंत्रणांना यश आले आहे; मात्र गेल्या सात दिवसांत रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर दुप्पट झाला आहे. सध्या मुंबईत ९१ हजार ७३१ उपचाराधीन बाधित आहेत.
मुंबईची सध्याची अंदाजित लोकसंख्या एक कोटी २९ लाखांच्या आसपास आहे. त्यानुसार आजवर ६.७८ टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईत आजवर एक कोटी ४१ लाख ३५ हजार ५५६ चाचण्या झाल्या आहेत. चाचण्या झालेल्यांपैकी ६.१९ टक्के संशयितांना बाधा झाली आहे.
मुंबईत १ जानेवारी रोजी चाचण्या झालेल्यांपैकी १३.२८ टक्के संशयितांना बाधा झाल्याचे आढळत होते. आता सात दिवसांत हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. ७ जानेवारी रोजी पॉझिटिव्हिटी दर २८.९४ टक्क्यांवर पोहोचला.
अंधेरीत सर्वाधिक रुग्ण
अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम, के पश्चिम प्रभागात आजवर ५९ हजार १३० रुग्णांची नोंद झाली. त्यातील १० हजार ७०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल बोरिवली ‘आर’ प्रभागात ५३ हजार ३९६ रुग्णांची नोंद झाली. सध्या चार हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.