आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

sakal_logo
By
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा जानेवारीऐवजी फेब्रुवारीत होणार मुंबई, ता. ८ : ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १४ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारीपासून सुरू होणार होत्या; तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा या २८ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारीपासून सुरू होणार होत्या. राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त विरेंद्र सिंग, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top