रोहा - मुरुड तालुक्यात अवकाळी पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहा - मुरुड तालुक्यात अवकाळी पाऊस
रोहा - मुरुड तालुक्यात अवकाळी पाऊस

रोहा - मुरुड तालुक्यात अवकाळी पाऊस

sakal_logo
By
रोहा-मुरूड तालुक्यात अवकाळी पाऊस कडधान्य पिकासह वीटभट्टीचेही नुकसान रोहा, ता. ८ (बातमीदार) ः रोहा व मुरूड तालुक्यात आज दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. या बिगरमौसमी पावसाचा वीटभट्टीमालकांबरोबर कडधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रोहा, कोलाड, चणेरा, नागोठणे, घोसाळे, भालगावसमवेत मुरूड तालुक्यातील बोर्ली मांडला, शिघ्रे, सालाव या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शनिवार रोह्यातील खांब, सुकेली, कोलाड, धाटाव रोहे शहर व अन्य ग्रामीण भागात दुपारनंतर मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. काही दिवस सकाळी थंडी व नंतर आज अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी - बागायतदारांच्या कडधान्य व भाजीपाला या पिकांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top