डायलिसिसचा रुग्णांसाठी राखीव खाटांची व्यवस्था करण्याची मागणी

डायलिसिसचा रुग्णांसाठी राखीव खाटांची व्यवस्था करण्याची मागणी

डायलिसिसच्या रुग्णांसाठी राखीव खाटांची व्यवस्था करण्याची मागणी विरार, ता. ९ (बातमीदार) ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वसई-विरार पालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांसाठी डायलिसिस उपचाराची व्यवस्था नसल्यामुळे अनेक गरीब रुग्णांना डायलिसिस उपचारांसाठी मुंबई किंवा इतर ठिकाणी जावे लागत असल्याचे दिसून आले. याबाबत भाजप वसई-विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकारी यांना लेखी पत्र देऊन डायलिसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी खाटा उपलब्ध कराव्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान, या मागणीसंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने व्यवस्था करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत, असे वैद्यकीय विभागाचे उपायुक्त किशोर गवस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com