ठाणे-दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर चाचणी
डिझेल इंजिनची दुसऱ्यांदा यशस्वी धाव
मुंबई, ता. ९ : मध्य रेल्वेवर भविष्यातील प्रवास वेगवान होण्यासाठी ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्णत्वास गेली. सध्या या मार्गिकेच्या सुरक्षेची चाचणी सुरू आहे. त्यासाठी रविवारी रेल्वे प्रशासनाने ३६ तासांचा ब्लॉक घेतला. या काळात खाडी पुलावरील दोन मार्गिकांची वजन पेलण्याची क्षमता तपासली गेली. या मार्गिकांवरून दुसऱ्यांदा दोन डिझेल इंजिन चालवण्यात आली. ही चाचणी यशस्वी पद्धतीने पार पडली.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या मध्यावधीस मार्गिका सुरक्षाविषयक कामे सुरू राहतील. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात या मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने आणि नियमित वेळापत्रकानुसार होईल.
...
रुळांवर...
- ठाणे आणि दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामानिमित्त ८ जानेवारी रोजी (शनिवार) दुपारी २ ते १० जानेवारीच्या (सोमवार) मध्यरात्री २ वाजेपर्यंत ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला.
- या काळात पुलाखालील ठाणे-विटावा रोडदरम्यान पश्चिमेला नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गिकेची जुन्या डाऊन आणि अप धीम्या मार्गांशी जोडणी करण्या आली.
- दैनंदिन रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात आली.
- हा ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते दिवादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरून नियुक्त रेल्वे मार्गावरून उपनगरी रेल्वेगाड्या धावतील.
- २४ हून अधिक रेल्वे मार्गांची जोडणी आणि तोडणी केली जाणार आहे. यातील १४ रेल्वे मार्गांचे काम पूर्ण झाले आहे.
...
प्रकल्पाचे फायदे
- लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी कल्याण ते लोकमान्य टिळक टर्मिनस स्वतंत्र मार्ग तयार होईल.
- सुमारे ८० उपनगरी फेऱ्या वाढवण्यात येतील. त्यामुळे लोकलमधील गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल.