gym
gymsakal media

जिम चालकांमध्ये थोडी खुशी...ज्यादा गम

लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश; मास्क आवश्यक

घाटकोपर : गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव (corona infection) वाढतो, या कारणाने कोरोनाच्या पहिल्या लाटेत टाळेबंदीमध्ये अडकलेल्या जिम चालकांवर (restrictions on gym) तिसऱ्या लाटेत पुन्हा संक्रांत ओढवल्याची स्थिती आहे. मुंबईसह राज्यभरात कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण (omicron patients) दुपटीने वाढत असल्याने राज्य सरकारने (Maharashtra government) सरसकट टाळेबंदी न करता कडक निर्बंध १० जानेवारीपासून लागू केले आहेत. (Gym owner disappointment as government announced new corona restriction on pandemic)

gym
मुंबई : ४८ तासात दोन पोलीसांचा कोरोनामुळं मृत्यू; ५२३ जणांना संसर्ग

सरकारच्या या निर्बंधांमध्ये मुंबईतील जिम चालकांनाही नियम जाहीर केले आहेत. ५० टक्के क्षमतेने जिम सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, अशांनाच मास्क आवश्यक करत प्रवेश देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिम चालकांमध्ये थोडी खुशी...ज्यादा गम व्यक्त होत आहे. मुंबईत कोरोनाचे नवीन रुग्ण २० हजार तर, राज्यात रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होत असल्याने राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार, १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. तिसरी लाट तीव्र असल्याने सरकारने जारी केलेले निर्बंध हे गरजेचेच आहेत. मात्र जिम ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास जरी परवानगी असली तरी जवळजवळ १५ ते १८ वयोगटातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात जिम करण्यासाठी येतात.

gym
Video : समुद्रात बुडणाऱ्या पर्यटक महिलेचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण!

त्यात १८ ते पुढील वयोगटातील मोठ्या व्यक्तीही जिममध्ये येतात. सध्या १५ ते १८ वयोगटातील युवकांचे लसीकरण सुरू आहे. तरी उर्वरित १० टक्के लोकांमध्ये जिम कशी चालवणार, टाळेबंदीचा टप्पा असाच वाढत राहिला तर जिमचे भाडे, ट्रेनरचे वेतन, वीज बिल कसे भरायचे, असे प्रश्‍न जीम चालकांकडून उपस्थित केले जात आहेत.

"५० टक्के क्षमता आम्ही पाळू, मात्र जिमचे भाडे, वीज बिल, ट्रेनरचे वेतन कसे देणार. जिमचे साहित्य कर्ज काढून घेतलेले आहे. त्याचे हप्तेही बाकी आहेत. टाळेबंदी पुढे वाढली तर पहिल्या लाटेासारखच परिणामी या वेळेसही होऊ शकतो." - उदय सावंत, शिवस्फूर्ती जिम्नॅस्टिक, माधवबाग, घाटकोपर.

"जिममध्ये ५० टक्के उपस्थितीची क्षमता हे ठीक आहे. पण अनेकांचे लसीकरण बाकी आहे. त्यात काही जणांनी वर्षभराची आणि ६ महिन्याची फी भरलेली आहे. त्यांना लस नाही म्हणून प्रवेश न दिल्यास उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यात महिन्याचे पूर्ण भाडे, वीज बिल, वेतन म्हणजे जिम सुरू राहून चिंतेत भरच आहे."

- अमित पेडणेकर, फिटनेस एज जिम, भटवाडी, घाटकोपर.

"थंडीत जिम केल्याने फिटनेसमध्ये चांगला परिणाम दिसतो. अशात सरकारने निर्बंध जारी केले आहेत. एक फायदा की माझे दोन डोस पूर्ण झाले आहेत. कोरोना वाढतो, हे देखील सत्य आहे. आणि सरकारच्या नियमांचे पालन करून आम्ही जिम करू. आता ज्यांचे डोस पूर्ण नाही अशांनी मात्र दोन डोस पूर्ण केलेच पाहिजेत."

- प्रतीक केसरकर, ग्राहक, घाटकोपर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com