मुंबई : ४८ तासात दोन पोलीसांचा कोरोनामुळं मृत्यू; ५२३ जणांना संसर्ग | Mumbai Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Police
मुंबई : ४८ तासात दोन पोलीसांचा कोरोनामुळं मृत्यू; ५२३ जणांना संसर्ग

मुंबई : ४८ तासात दोन पोलीसांचा कोरोनामुळं मृत्यू; ५२३ जणांना संसर्ग

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांनी (corona new patients) वीस हजारांचा टप्पा पार केल्याने मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (corona third wave) सुरुवात झाली आहे. कोविड काळात नागरिकांच्या सेवेत कर्तव्यदक्ष राहणाऱ्या पोलिसांचाही कोरोनाने बळी घेतला. तिसऱ्या लाटेतही पोलिसांना कोविडची बाधा झाली असून ४८ तासांच्या आत मुंबईच्या दोन पोलिसांचा कोरोनामुळं मृत्यू (two Mumbai police died) झाला आहे. नागपाड्याच्या मोटर वाहन विभागातील सहाय्यक उप निरीक्षक महेंद्रसिंग भाटी (५७) असं मृत पावलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. दरम्यान, कोरोनाने मृत्यू झालेल्या मुंबई पोलिसांची संख्या १२५ वर पोहोचली आहे. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Two Mumbai police died within forty eight hours due to corona infection)

हेही वाचा: रोहा : 'त्या' हत्या प्रकरणातील फरार आरोपी अखेर गजाआड

याबाबत सविस्तर वृत्त असं की, मागील आठ दिवसांत तब्बल ५२३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ८ जानेवारी पर्यंत पोलीस विभागातील सक्रिय रुग्णांची संख्या ५२३ झाली आहे. "गोरेगाव पोलीस कॅम्पमध्ये राहणारे भाटी हे मोटर वाहन विभागात एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चालक म्हणून काम पाहत होते. भाटी यांना छातीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना शनिवारी रात्री ३ वाजता लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ३० एप्रिलला ते सेवानिवृत्त होणार होते." अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली आहे.

मागील २४ तासांमध्ये पहिल्यांदाच १६१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती कोरोनाच्या रिपोर्टमध्ये देण्यात आलीय. तर ३४ पोलीस कर्मचाऱ्यांना एका पेक्षा जास्त वेळा कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई पोलीस दलातील ३९०८६ कर्मचाऱ्यांचा पहिला डोसचे लसीकरण झाले आहे. तर ३५६९७ कर्मचारी पूर्ण लसवंत झाले आहेत. फक्त ४ % (१६२८) आणि १२.३२ % (५०७०) या कर्मचाऱ्यांचा पहिला आणि दुसरा डोसचं लसीकरण होणं बाकी आहे.

Web Title: Two Mumbai Police Died Within Forty Eight Hours Due To Corona Infection Mumbai Corona Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top