राज्यात ओमिक्रॉन बाधितांमध्ये वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : राज्यात २०७ ओमिक्रॉन बाधित रुग्णांची आज नोंद झाली. रुग्णांपैकी १५५ बी जे वैद्यकीय महाविद्यालय; तर ५२ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कळवले आहेत. त्यात सांगली ५७, मुंबई ४०, पुणे पालिका २२, नागपूर २१, पिंपरी-चिंचवड १५, ठाणे पालिका १२, कोल्हापूर ८, अमरावती ६, उस्मानाबाद ५, बुलडाणा-अकोला प्रत्येकी ४, गोंदिया ३, नंदुरबार-सातारा-गडचिरोली प्रत्येकी २, औरंगाबाद, जालना, लातूर आणि मिरा-भाईंदर प्रत्येकी १ रुग्ण नोंदवला गेला.
आजवर राज्यात एकूण १,२१६ ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. यातील २६ रुग्ण हे इतर राज्यांतील; तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहेत. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत; तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी ४५४ रुग्णांना त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजवर ३,८६८ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
...
विमानतळावरील तपासणीचा तपशील
एकूण प्रवासी आरटी-पीसीआर बाधित
२५५३२४ ७१८३४ ९०१
...