ठाकरे रुग्णालयातील अपघात विभाग सुरू
रिपब्लिकन पक्षाच्या मागणीची दखल
गोरेगाव, ता. १० (बातमीदार) ः जोगेश्वरीचे बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय हे कोरोना रुग्णांसाठी समर्पित केल्याच्या पालिकेच्या आदेशानंतर गोरेगाव रिपब्लिकन पक्षा(आ)कडून रुग्णालयातील अपघात विभाग व बाह्यरुग्ण विभाग बंद न करण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्याची दखल घेत रुग्णालयाचा अपघात विभाग सुरू करण्यात आला. शिवाय तांत्रिक अडचणी लवकरच दूर करून बाह्यरुग्ण सेवा सुरू करू, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या मागणीला यश आल्याने रमेश पाईकराव, रेश्मा खान यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी प्रशासनाचे आभार मानले. रिपब्लिकन पक्ष गोरेगाव तालुक्याच्या वतीने आक्रमक भूमिका घेत ८ जानेवारीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयाकडे लेखी पत्राद्वारे उपरोक्त विभाग सुरू करण्याची मागणी केली होती. रुग्णालय प्रशासनाला काही तांत्रिक अडचणी येत असतील तर खासदार रामदास आठवले यांच्या मध्यस्तीने पालिका आयुक्त यांच्याशी चर्चाही केली जाईल, असे रमेश पाईकराव यांनी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
...