महिलांच्या राजकीय नेतृत्वावर बुधवारी ऑनलाईन परिषद
मुलुंड, ता. १० (बातमीदार) ः स्त्रियांच्या राजकीय नेतृत्वासंबंधी सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला राजकीय नेतृत्व : वैश्विक ते स्थानिक - आव्हाने व संधी’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आॅनलाईन पद्धतीने बुधवारी (ता. १२) करण्यात आले आहे.
या परिषदेत राज्य सभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. विभूती पटेल, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुंबई महापालिकेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, भाजप राज्य उपाध्यक्ष माधवी नाईक, महिला राजसत्ता आंदोलनाचे भीम रासकर, मुंबई विद्यापीठाच्या मानव्यविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजेश खरात, मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉ. मृदुल निळे आदी मान्यवर संवाद साधणार आहेत.
विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन राज्यशास्त्र विभागातर्फे विभागप्रमुख उपप्राचार्या डॉ. प्रियंवदा टोकेकर, उपप्राचार्या संगीता दीक्षित व इतर प्राध्यापकांनी केले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे रवींद्र साठे व देवेंद्र पै यांचे सहकार्य या परिषदेसाठी लाभले आहे.
...