जोगेश्वरीमध्‍ये फेरीवाल्यांची जत्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोगेश्वरीमध्‍ये फेरीवाल्यांची जत्रा
जोगेश्वरीमध्‍ये फेरीवाल्यांची जत्रा

जोगेश्वरीमध्‍ये फेरीवाल्यांची जत्रा

sakal_logo
By
जोगेश्वरीमध्‍ये फेरीवाल्यांची जत्रा कोरोना नियमांची पायमल्ली जोगेश्वरी, ता. १० (बातमीदार) ः जोगेश्‍वरी पूर्वेत सर्वोदयनगर परिसरात फेरीवाल्यांसह नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोना रुग्‍णांची संख्या मुंबईसह राज्यात वाढत असताना फेरीवाले राज्य सरकार आण‍ि पालिकेने घालून दिलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून गर्दी करत आहेत. येथील सर्वोदयनगर बसथांब्याजवळ रस्त्याच्या दुतर्फा तसेच रस्‍त्‍याच्‍या एका बाजूला पूर्ण पदपथाभर फेरीवाले बिनदिक्कतपणे व्यवसाय करत आहेत. रस्‍त्‍यावरील भाजीच्या व अन्‍य गाड्या लावल्याने सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडी निर्माण होऊन येथील नागरिकांप्रमाणे जवळ असणाऱ्या शाळेतील विद्यार्थांनादेखील याचा त्रास होतो. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी जणू येथे जत्रेचे स्‍वरूप निर्माण होते. येथील बहुतांश फेरीवाल्यांच्‍या तोंडावर मास्क लावलेला नसतो. तसेच राहत्या वस्तीतील आतील बाजूस हेमा इंडस्ट्रीसमोरील एम.एच.बी कॉलनी क्रमांक ४ ते १७ बैठ्या चाळीत विनामास्‍क अनेक फेरीवाले फिरत असल्याने पालिकेच्या मार्शलने या फेरीवाल्‍यांवरही कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top