हळदी-कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हळदी-कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी गर्दी
हळदी-कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

हळदी-कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

sakal_logo
By
वाणाचे साहित्‍य खरेदीसाठी लगबग यंदा १५ ते २० टक्‍के वाढ तुर्भे, ता. १० (बातमीदार) : मकरसंक्रांतीत तिळगूळ, हळदी-कुंकवाच्या वस्तूंसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी शहरातील विविध बाजारपेठांत महिलांची गर्दी वाढली आहे. यंदा वाणाच्या साहित्यात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. अवघ्‍या दोन दिवसांवर आलेल्‍या मकर संक्रांतीच्या तयारीसाठी महिलांची लगबगही सुरू आहे. तीळगूळ, हळदी-कुंकवाच्या वस्तूंसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी शहरातील एपीएमसी मार्केट, वाशी येथील सेक्टर ९, जनता मार्केट, डी मार्टसह स्‍थानिक बाजारपेठांत महिलांची गर्दी होत आहे. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला, असा संदेश देत एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीनिमित्त बाजारात सुगड्यांसोबतच विविध प्रकारचे वाण, तीळगूळ, बांगड्या आदी साहित्य उपलब्ध आहे. यंदा वाण वस्तूंच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाल्याने, महिलांनी प्लास्टिकच्या वस्तूंना पसंती दिल्याचे दिसते. वाणासाठी प्लास्टिकमध्ये १०० रुपयांपासून ते ५०० रुपये डझनपर्यंत वस्‍तू उपलब्‍ध आहेत; तर स्टीलवस्‍तू २०० ते १००० रुपये डझनाने विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दुकानदारांनी सांगितले. संक्रांतीला वाण देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये विविध प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. त्यात ज्वेलरी बॉक्‍स, छोट्या पर्स, मोबाईल कव्हर, स्टिल भांड्यांमध्ये ताट, वाट्या, चमचे, बाउल, अगरबत्ती स्टॅंड आदी वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय अनेक ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या वस्तूंचा प्रामुख्याने डसबीनचे वाण देण्यात येणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर संक्रांत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आतापासूनच राजकीय पक्षांनी आपल्या प्रभागातील महिलांसाठी वाण खरेदी सुरू झाली आहे. सध्या कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने यंदा हळदी-कुंकू कार्यक्रमावर संक्रांत येणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. दैनंदिन उपयोगी वस्‍तू प्लास्‍टिक, स्‍टीलच्या वस्‍तू दिल्‍यास, प्रत्‍येकीच्या वापरात येईलच असे नाही. त्‍यामुळे गेल्‍या दोन-तीन वर्षांत दैनंदिन उपयोगी वस्‍तू भेट देण्याकडे कल वाढला आहे. यात साखर, पोहे, गूळ, जिरे, मोहरी, एव्हरेस्‍टचे मसाले, मॅगीबरोबरच डेटॉल साबण, नारळ आदी वस्‍तू वाण म्‍हणून दिल्‍या जात आहेत.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top