ठाणे : कोरोनाबांधितांमध्ये झपाट्याने वाढ दहा दिवसात ४६ हजार रुग्णांची नोंद | thane corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona patients

ठाणे : कोरोनाबांधितांमध्ये झपाट्याने वाढ दहा दिवसात ४६ हजार रुग्णांची नोंद

sakal_logo
By

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात (Thane) कोरोना रुग्णांच्या संख्येत (corona patients increases) झपाट्याने वाढ होत आहे. त्यात मागील रविवारी नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या थेट १० हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. तर या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मागील १० दिवसांत जिल्ह्यात ४६ हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (corona patients increases speedily in thane)

हेही वाचा: BMC : शिवसेनेचा वाचननामा सुसाट; दोन हजार कोटींच्या विकासकामांचे प्रस्ताव

त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नवनवीन विक्रम करीत आहे. त्यामुळे ठाणे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडत आहे; तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवरदेखील ताण वाढत आहे. अशातच ठाणे जिल्ह्यात रविवारी नऊ हजार ६१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत नोंदणी झालेल्या रुग्णांचा आकडा सहा लाख २० हजार ९५४ झाला आहे; तर पाच लाख ६१ हजार ६७६ जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत मृतांची संख्या ११ हजार ६२८ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा ३३ हजार १२६ वर पोहोचला आहे. यामध्ये ठाणे महापालिका हद्दीत रविवारी दोन हजार ६२६ रुग्ण सापडले; तर सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ८६ झाली आहे. तर आतापर्यंत आढळून आलेल्या एक लाख ५८ हजार ६७७ रुग्णांपैकी एक लाख ४० हजार ८९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. चौकट ग्रामीणमध्ये एका दिवसात ३९२ रुग्ण अंबरनाथमध्ये २५१ पॉझिटिव्ह आढळून आले असून ६८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कुळगाव बदलापूरमध्ये १८७ रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये एकाच दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९२ झाली असून एक हजार ६१६ रुग्ण ॲक्टिव्ह असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ThaneCoronavirus
loading image
go to top