BMC
BMCsakal media

BMC : शिवसेनेचा वाचननामा सुसाट; दोन हजार कोटींच्या विकासकामांचे प्रस्ताव

मुंबई : महापालिकेची (bmc) मुदत संपत आल्यावर सत्ताधारी शिवसेनेच्या (shivsena) वचननाम्यानेही वेग घेतला आहे. नदी शुद्धीकरण, पाणीपुरवठा, पर्जन्यवाहिन्यांच्या कामासाठी मिळून तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या बैठकीत मांडण्यात आले आहेत. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीपूर्वी (bmc election) शिवसेनेने मुंबईतील नागरिकांसाठी वचननामा प्रसिद्ध केला होता. त्यात नदी शुद्धिकरण, पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यावर उपाय, चौक, वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणासह ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वीच मालमत्ता करमाफीच्या घोषणेवर शिक्कमोर्तब केले आहे. (thousand crore Proposal of shivsena for developments in bmc)

BMC
चंद्रपूर : पत्नीचा खून केल्यानंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, आणि...

लवकरच तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाईल. महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपणार आहे. कोविडमुळे निवडणुका कधी होतील, याबाबत साशंकता असली तरी आता शिवसेनेची वचननामा पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी दहिसर नदीच्या शुद्धीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पोयसर नदीच्या शुद्धीकरणाचाही प्रस्ताव आहे. यावर महापालिका एक हजार ४२८ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. तसेच मुंबईतील उद्यान, मैदान, वाहतूक बेटांच्या देखभालीसाठी १८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खर्चाची तरतूद करण्यासाठी निधीचेही स्थलांतर करण्यात येणार आहे.

१०० हून अधिक प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल १०० हून अधिक प्रस्तावांवर चर्चा करण्यात येणार आहे. या आठवड्यात प्रशासनाकडून ५६ प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. मागील आठवड्याची बैठक तहकूब झाल्याने त्यावेळचे सुमारे ५० प्रस्ताव प्रलंबित आहेत. १८ दिवसांत चार हजार कोटी स्थायी समितीने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल २ हजार २०० कोटींहून अधिकच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली.

BMC
मुंबईकरांना दिलासा! सहा हजारांनी रूग्णसंख्या घटली

त्यानंतर आता बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीत दोन हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. अवघ्या १८ दिवसांत ४ हजार कोटींहून अधिक खर्चाचा निर्णय होत आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी १०० कोटी पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने तब्बल १०० कोटी रुपयांचे प्रस्ताव मांडले आहेत. यात शहर विभागातील पर्जन्यवाहिन्यांची क्षमता वाढविणे, नव्या पर्जन्यवाहिन्या टाकणे अशी कामे करण्यात येणार आहेत. हिंदमाता येथील पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दादर पूर्व येथील प्रमोद महाजन उद्यानात भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. या कामाअंतर्गत दुसरी टाकी बांधण्यासाठी २७ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

तर हे तीन प्रस्ताव मिळून ९९ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. पाणीपुरवठ्यात सुधारणा मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जलवाहिन्या बदलणे, नव्या जलवाहिन्या टाकणे, तसेच सिमेंटच्या रस्त्याखाली गेलेल्या वाहिन्यांचे मार्ग बदलण्यासाठी ७९ कोटी ९९ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा, मुंबादेवी, गिरगाव या भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दुर्गादेशी मैदानात जलाशय बांधण्यात आला आहे. या ठिकाणच्या पम्पिंगची क्षमताही वाढविण्यात येणार आहे. या चार प्रस्तावांसाठी ८१ कोटींहून अधिकचा खर्च करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com