जवाहर नवोदय विद्यालयात नळपाणी योजना
खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
माणगाव, ता. १० (बातमीदार) : जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन ८ जानेवारीला करण्यात आले. विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन करण्यासाठी ते निजामपूर विभागात आले होते. त्या वेळी त्यांनी विद्यालयातील नळपाणी पुरवठा योजनेलाही सुरुवात केली.
जवाहर नवोदय विद्यालयाचे शैक्षणिक विकासात मोठे योगदान आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी उत्तम शिक्षण घेत आहेत, असे उद्गार खासदार सुनील तटकरे यांनी काढले. या विद्यार्थ्यांसाठी बहुउद्देशीय सभागृह बांधण्याचे आणि बाजारपेठ ते नवोदय विद्यालय रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन या वेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिले. विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन करण्यासाठी ते निजामपूर विभागात आले होते. त्या वेळी त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयातील नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन केले. याप्रसंगी वेळी नवोदय विद्यालय समितीचे पुणे विभागीय उपायुक्त पी. रवीकुमार, सरपंच राजाभाऊ रणपिसे, पाणीपुरवठा योजनेसाठी मोफत जागा देणारे बाळाराम दबडे, प्राचार्य के. वाय. इंगळे, महाड विधानसभा अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर, खासदार समिती सदस्य तुकाराम सुतार, संगीता बक्कम, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गुरव, निजामपूर विभाग अध्यक्ष संदीप जाधव, निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नवोदय विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ -
माणगाव : जवाहर नवोदय विद्यालयात नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करताना खासदार सुनील तटकरे.